#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठीचा लाँगमार्च कर्नाटक हद्दीवर रोखला

प्रकाश कोकितकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी या लाँगमार्चला प्रारंभ झाला. साडे दहाच्या दरम्यान हा लाँगमार्च कर्नाटक हद्दीजवळ पोहोचला तेव्हा कर्नाटक पोलिसांनी हा मार्च आडवला. 

सेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी या लाँगमार्चला प्रारंभ झाला. पण साडे दहाच्या दरम्यान हा लाँगमार्च कर्नाटक हद्दीजवळ पोहोचल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी हा मार्च अडवला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनापती कापशी येथून कोल्हापूरातील दसरा चाैकपर्यंत मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे. निपाणी - मुरगुड मार्गावरून हा लाँगमार्च आज कागल येथे पोहोचणार होता. तेथे या लाँगमार्चचा मुक्काम होता. त्यानंतर उद्या हा लाँगमार्च कोल्हापूर येथील दसरा चाैकात पोहोचणार आहे. पण आज कर्नाटक बंदची हाक देण्यात आल्याने सीमाभागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा मार्च साडेदहाच्या दरम्यान लिंगनूर येथे पोहोचलो. तेथून तो कर्नाटक हद्दीत जाणार होता. पण कर्नाटक पोलिसांनी बंदचे कारण पुढे करत हा मार्च आडवला आहे. यामुळे कार्यकर्ते व पोलिसात बाचाबाची झाली. मार्चला परवानगी मिळवण्यासाठी सीमेवरच लोकांनी ठिय्या मांडला आहे. कर्नाटक पोलिसांच्या तुकड्या येथे थांबून आहेत.

कर्नाटक पोलिसांशी हुज्जत सुरु असल्याने महाराष्ट्र पोलिस यावर तोडगा काढण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पोलिस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी कर्नाटक पोलिसांशी चर्चा सुरू केली आहे. कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीत मोर्चा पायी न नेता कार्यकत्यांनी गाडीतून जावे असा तोडगा सांगितला आहे. पण अद्याप कार्यकर्ते हे आपल्या मागणीवर अडून बसले आहेत. 

Web Title: Kolhapur News Maratha reservation Long march Senapati Kapshi to Kolhapur