आधारकार्ड संकल्पनेतून साकारली विवाहपत्रिका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

इचलकरंजी - संगीत आणि कला क्षेत्रात असलेल्या दोघांनी आपला विवाह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याचा निर्णय घेतला. आज घरोघरी असणाऱ्या आधारकार्डचा ‘आधार’ त्यांनी विवाहपत्रिकेसाठी घेतला आहे. त्यावर असणाऱ्या क्‍यूआर कोडचा वापर व्हिडिओ दिसण्यासाठी, तर विवाह हा संगीत सुरात करण्याचा निर्णय घेतला. 

बुबनाळ (ता. शिरोळ) येथील रविकिरण कुंभोजे आणि जुन्नर (जि. पुणे) येथील मयूरी यंदे गुरुवारी (ता. ९) उदगाव कुंजवन येथे विवाहबद्ध होत आहेत. यानिमित्त काढलेली पत्रिका चर्चेची ठरली. जुन्नर येथील विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये संगणक शिक्षक असलेले रविकिरण आणि जुन्नरमधील कथक शिक्षिका मयूरी या नवदांपत्याने ही संकल्पना अस्तित्वात आणली आहे. आधार क्रमांकाच्या ठिकाणी विवाहाची तारीख, छायाचित्राच्या ठिकाणी दोघांची छायाचित्रे आहेत.

आधारकार्डबाबत जागृती व्हावी, तसेच नवीन तंत्रज्ञान विवाहपत्रिकेच्या माध्यमातून पोचावे, हा आमचा प्रयत्न आहे.
- रविकिरण कुंभोजे,
बुबनाळ

Web Title: Kolhapur News Marriage card on Adharcard concent