वाढत्या उष्म्याने पक्ष्यांचे स्थलांतर..

संदीप खांडेकर
मंगळवार, 3 एप्रिल 2018

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम पक्षी, प्राण्यांवर होतो हे वास्तव असले, तरी त्याचे प्रमाण व्यस्त दिसते. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकताच कमी आहे, तेथे पक्ष्यांना उष्माघात होतो. अगदीच तापमान वाढीने टोक गाठले आहे, तेथील पक्षी स्थलांतर करतात.

कोल्हापूर - वाढत्या उष्म्याचा सामना करण्यासाठी पक्षी स्थलांतर तर करतातच; शिवाय स्वत:त शारीरिक बदल घडवतात. अन्न, पाणी व थंड भूभागाच्या शोधात ते कित्येक किलोमीटर दूर जातात. उष्माघाताचे प्रमाण त्यांच्यात असले, तरी अन्य प्राण्यांच्या तुलतेन ते कमी असते. उन्हाच्या झळांपासून त्यांचे रक्षण करायचे झाल्यास कृत्रिम पाणवठे निर्मिती आवश्‍यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य व शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र अधिविभागातील प्रा. डॉ. ए. डी. जाधव यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केले.   

श्री. जाधव म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम पक्षी, प्राण्यांवर होतो हे वास्तव असले, तरी त्याचे प्रमाण व्यस्त दिसते. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलकताच कमी आहे, तेथे पक्ष्यांना उष्माघात होतो. अगदीच तापमान वाढीने टोक गाठले आहे, तेथील पक्षी स्थलांतर करतात. कावळा, चिमणी, मुनीया, सुगरण, करकोचा, फ्लेमिंगो, बगळे हे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करताना आढळतात.’’

उन्हाळ्यातील पक्ष्यांची दिनचर्या अशी :

 •  उन्हाळ्यात लवकर बाहेर पडतात

 •  दुपारी झाडावर विसावा घेतात

 •  सायंकाळी पुन्हा भक्ष्याच्या शोधात भटकतात

 •  घरटी बांधणे, अंडी घालणे, ही प्रक्रिया जेथे पाणी, खाद्य, वातावरण थंड असेल त्या ठिकाणी करतात

 •  थंड प्रदेशात अन्नाचा तुटवडा, प्रजाती नष्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी व वातावरणाचा परिणाम टाळण्यासाठी अन्य ठिकाणी स्थलांतर करतात

 •  उन्हाळ्यात पक्ष्यांचे मुख्य खाद्य कीटक.
   कीटकांपासून त्यांना मुबलक प्रथिने मिळतात

ते म्हणाले, ‘‘विशेष म्हणजे ऋतुमानानुसार ते त्यांच्या दिनचर्येत बदल करतात. हिवाळ्यात हे पक्षी उशिरा अन्नाच्या शोधात बाहेर पडतात, तर उन्हाळ्यात सकाळी लवकर उठून अन्नाचा शोध घेतात. उन्हाच्या झळा वाढायला लागल्या की, ढेरेदार वृक्षांच्या फांद्या, तलावाकाठावरील झाडांवर विसावा घेतात.’’ 

उन्हाळ्यातील पक्ष्यांची दिनचर्या अशी :

 •  उन्हाळ्यात लवकर बाहेर पडतात
 •  दुपारी झाडावर विसावा घेतात
 •  सायंकाळी पुन्हा भक्ष्याच्या शोधात भटकतात
 •  घरटी बांधणे, अंडी घालणे, ही प्रक्रिया जेथे पाणी, खाद्य, वातावरण थंड असेल त्या ठिकाणी करतात
 •  थंड प्रदेशात अन्नाचा तुटवडा, प्रजाती नष्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी व वातावरणाचा परिणाम टाळण्यासाठी अन्य ठिकाणी स्थलांतर करतात

राज्य जैवविविधता मंडळाच्या वेबसाईटवरील माहिती : 

 •  जगभरात पक्ष्यांच्या ९०२६ प्रजाती नोंद
 •  भारतात १२२८ पक्ष्यांच्या प्रजातींचा आढळ
 •  महाराष्ट्रात ५५६ प्रजातींचे सक्षमपणे जतन करणे शक्‍य

काय करता येईल..? 

 •  कृत्रिम पाणवठे निर्माण झाले पाहिजेत
 •  मातीच्या पसरट भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला हवे
 •  बाजरी, राळे, तांदळाची कणी, ज्वारी, गहू घराच्या परिसरातील मातीच्या भांड्यात ठेवावेत.
Web Title: Kolhapur News Migration of Birds due to hike in heat