सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील दुध उत्पादकांना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

कोल्हापूर - सरकारने गायीचा दूधखरेदी दर २५ रुपये करण्याचे घोषित केल्याने याचा सर्वाधिक लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना होणार आहे. सध्या जिल्ह्यातील दूध संघाचा दर २३ रुपये प्रतिलिटर इतका आहे. नव्या निर्णयानुसार या संघांना २५ रुपये दर द्यावा लागेल. स्पर्धेतून हा दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

तातडीने आणखी दोन रुपये वाढतीलच; पण याहीपेक्षा आणखी दोन रुपये दर वाढून हा दर २७ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्‍यता आहे. सरकारने जर अनुदान दिल्यास जिल्ह्यातील अग्रगण्य संघ हाच दर २७ रुपये देऊ शकतील, अशी शक्‍यता आहे. रात्री उशिरापर्यंत सरकार निर्णयाबाबत अद्यापही नेमकी तपशीलवार माहिती दूध संघाकडे उपलब्ध झाली नसल्याने संघाचे आर्थिक गणित काय असेल, याची माहिती देण्यास संघांच्या प्रतिनिधींनी नकार दिला. 

सरकारने प्राधान्याने जादा ठरणाऱ्या दुधास अनुदान देण्याबाबत विचार केला आहे. भुकटी तयार करणाऱ्या संघांना याचा जास्त लाभ होऊ शकेल. शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार नसल्याने संघ सरकारने ठरवून दिलेल्या रकमेची नेमकी कशी जुळणी करणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. 

शेतकऱ्यांना २५ रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यातील दुधाचा दर्जा इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त चांगला असल्याने याचा लाभ जिल्ह्यातील उत्पादकांना इतर भागापेक्षा जास्त होऊ शकतो, असा अंदाज दूध संघांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

Web Title: Kolhapur News Milk agitation