#MilkAgitation स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

घुणकी/कोल्हापूर - दूध दराचा प्रश्न निकालात निघत नसल्याने आज किणी टोल नाक्यावर चक्का जाम करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर किणी नाका येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नाक्यावरील पथकर वसुली बंद करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. काल मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. सकाळी आंदोलनस्थळी प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

प्रमुख कार्यकर्ते मध्यरात्रीच ताब्यात

पेठवडगाव पोलिसांनी संघटनेच्या प्रमूख कार्यकर्त्यांना मध्यरात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेतले. जिल्हानियोजन समितीचे सदस्य- शिवाजीराव माने, वैभव कांबळे, संपत पोवार,  शिवाजी शिंदे, मनोहर देसाई यांचा यामध्ये समावेश आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी पथकर नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन जाहीर केल्यामुळे पहाटेपासूनच पोलीस मोठा बंदोबस्त होता. पोलिसांनी सकाळी साडे नऊपासून पथकर वसुली बंद केल्याने वाहतूक सुरळीत झाली. 

Web Title: Kolhapur News Milk agitation Swabhimani agitation