अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

कोल्हापूर  - "कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हे तर अंबाबाई' असा नारा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मुंबईत लक्ष वेधले. विधिमंडळाच्या दारात त्यांनी फलक फडकावून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी केली. 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. अंबाबाई मंदिरासंबंधी क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना दिली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून तेथे शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार होत आहे. श्रद्धेने दान केलेले दागिने, रोख रकमेची लूट पुजाऱ्यांकडून होत आहे. वर्षाला 348 कोटींचे उत्पन्न पुजाऱ्यांना मंदिराच्या माध्यमातून मिळते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 210 कोटींची गरज आहे. मंदिरातील उत्पन्नातून विकास आराखडा राबविला जाऊ शकतो. शासनाकडे निधी मागण्याची गरजच उरणार नाही. अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर शहर दोन-तीन महिने अस्वस्थ आहे. अंबाबाईच्या पोशाखावरून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात ठाण मांडून बसलेल्या पुजाऱ्यांनी भाविकांची लूट केली आहे. राजर्षि शाहू महाराजांनी पूजेसाठी काही पूजकांची नेमणूक केली होती. त्यांतील एकही पुजारी सध्या कोल्हापुरात नाही. कमिशन बेसवर पुजाऱ्यांनी इतरांची नेमणूक केली आहे, पुजारी हटवून शिर्डी, तुळजापूर, पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या एसआयटीच्या चौकशीचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे. देवस्थान समितीत लाखो-करोडो रुपयांचा जमिनींचा अपहार झाला आहे. मार्च 2015 च्या अधिवेशनात त्यासंबंधी लक्षवेधी मांडली होती. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीद्वारे चौकशीचे आश्‍वासन दिले होते, त्यावर कार्यवाही झालेली नाही. मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांना पाठीशी घालत आहे का? अशी शंका या निमित्ताने येते, असाही आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. 

Web Title: kolhapur news MLA Rajesh Kshirsagar