आमदारांचे रिपोर्ट कार्ड - कोल्हापूर जिल्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

राज्यात भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे सहा, भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील आमदारांनी कोणते महत्त्वाचे प्रश्‍न सोडवले? कुठल्या समस्या प्रखरपणे विधिमंडळात मांडल्या? तसेच भविष्यात मतदारसंघाच्या विकासाबाबत त्यांचे िव्हजन काय आहे? याचा लेखाजोखा, तसेच आमदारांच्या कामगिरीबाबत मतदारसंघातील नागरिकांना काय वाटते, याच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया, या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारे जिल्ह्यातील आमदारांचे हे रिपोर्ट कार्ड.

राज्यात भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे सहा, भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील आमदारांनी कोणते महत्त्वाचे प्रश्‍न सोडवले? कुठल्या समस्या प्रखरपणे विधिमंडळात मांडल्या? तसेच भविष्यात मतदारसंघाच्या विकासाबाबत त्यांचे िव्हजन काय आहे? याचा लेखाजोखा, तसेच आमदारांच्या कामगिरीबाबत मतदारसंघातील नागरिकांना काय वाटते, याच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया, या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारे जिल्ह्यातील आमदारांचे हे रिपोर्ट कार्ड.

मतदारसंघ - कोल्हापूर उत्तर - आमदार राजेश क्षीरसागर

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
टोलमुक्तीसाठी आंदोलने, हद्दवाढीसाठी आमरण उपोषण, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, खंडपीठासाठी विधानभवनात आवाज, सीपीआरमधील कंत्राटी कामगारांना किमान वेतनाचा लाभ, मुंबईसह, पुणे, कोल्हापूर येथे सात हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया, अंबाबाई मंदिरात पुजारी नेमण्यासाठी आंदोलन. 

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
शिक्षण क्षेत्रात बालवाडीपासून उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना विना देणगी प्रवेश, शिक्षण सम्राटांच्या विरोधात मोर्चा, शहरातील चाळीस शाळांना संगणकाचे मोफत वाटप, युवा सेनेच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप, वाचनालये, इमारत बांधकाम, शैक्षणिक पुस्तकांसाठी आर्थिक मदत.

आगामी २ वर्षांत काय करणार?
शहरातील प्रमुख उद्याने, बागबगीच्या, विरंगुळाच्या ठिकाणी वाय फाय झोन निर्माण करणार, ऐतिहासिक रंकाळा तलावात वॉटर पार्क, ॲम्युझमेंट पार्कसाठी प्रयत्न करणार, पंचगंगा घाटाप्रमाणे कसबा बावडा तसेच बापट कॅम्प येथील घाट विकसित करणार, कोल्हापूर शहरास जोडणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी, राधानगरी, हुपरी मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न.

निधी किती आणला?
मंजूर निधी - ४४९ कोटी २० लाख
खर्च -   १० कोटी ८१ लाख 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती -     ९५%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न -     ८००

मतदारसंघ ः इचलकरंजी - आमदार सुरेश हाळवणकर
तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
इचलकरंजी शहरासाठी वारणा नळपाणी योजना मंजूर, सायझिंग, प्रोसेसिंग उद्योगाला व्हॅटमधून वगळले, यंत्रमागाच्या वीजदरासाठी स्वतंत्र वर्गवारी जाहीर, आयजीएम रुग्णालयाचे शासनाकडे हस्तांतरण, अमृत योजनेतून ग्रीन सिटी प्रकल्पास मंजुरी, पंतप्रधान आवास योजनेची कार्यवाही सुरू, कोट्यवधीच्या रस्त्यांची कामे मार्गी, विविध ठिकाणी ओपन जीमची कामे पूर्ण, श्री क्षेत्र रामलिंग येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्न, मुद्रा कर्ज योजनेचा यशस्वी मेळावा, अनेक गरजू रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध, रुकडी येथील पंचगंगा नदीवरल पुलाचे बांधकाम सुरू.

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू, २० वाचनालयांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट, अनेक शाळांना ई-लर्निंग प्रोजेक्‍टर व संगणक भेट.

आगामी २ वर्षांत काय करणार?
यंत्रमागधारकांच्या कर्जावर व्याज अनुदान, यंत्रमागधारकांना प्रति युनिट १ रुपये वीज सवलत, घनकचरा प्रकल्प मंजुरी, सोलर सिटी प्रकल्प, शास्तीतून मिळकत धारकांची सुटका, झोपडपट्टी मुक्त शहर, इचलकरंजी स्वतंत्र तालुका निर्मिती.

निधी किती आणला?
मंजूर निधी  -    २५० कोटी
खर्च  -   १८० कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती  -  ९८%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -     ४५६

मतदारसंघ - शिरोळ -  आमदार उल्हास पाटील

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी, दोनशे कोटींची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर, कन्यागत महापर्वकाळ आल्याने शासनाकडून भरीव निधी, पंचायत समितीची प्रशासकीय इमारत. राजापूर बंधाऱ्यासह अन्य बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलयुक्‍त शिवार, कुरुंदवाड पेयजल योजना, तसेच ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून विकासकामे, कन्यागत महापर्व काळाअंतर्गत विकासकामे १२१.६४ कोटी, ग्रामसडक योजना ७ कोटी, राजापूर बंधाऱ्यासह अन्य बंधाऱ्यांची दुरुस्ती - ६ कोटी ५० लाख, कुरुंदवाड पेयजल योजना १३ कोटी ६५ लाख, कुरुंदवाड घाट सुशोभीकरण २ कोटी ३८ लाख, पंचायत समिती प्रशासकीय इमारत १ कोटी ८० लाख. 

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
शाळांना संगणक भेट. शैक्षणिक प्रश्‍‍न सोडविण्‍यासाठी पाठबळ.

आगामी २ वर्षांत काय करणार?
तालुक्‍यातील क्षारपड जमिनीचा व पाणंद रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा.

निधी किती आणला?
मंजूर निधी -    ३०० कोटी
खर्च  -   २०० कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती ः     ९५%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न ः     २९५

मतदारसंघ - करवीर - आमदार चंद्रदीप नरके 

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
कोल्हापूरचा टोल, हद्दवाढ याबरोबरच धामणी मध्यम प्रकल्प मंजुरी, कळे-खेरीवडे न्यायालय, कळे पोलिस स्टेशन, गुऱ्हाळघर व कडबाकुट्टीला शेतीपंपाप्रमाणे वीज दर, कोल्हापूर-गगनबावडा-विजयदुर्ग-तलेरा राष्ट्रीय मार्ग, शहराबाहेरचा प्रस्तावित रिंग रोड आदी कामे प्राधान्याने केली. 

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यावर भर, शालेय विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल, राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, अर्धमॅरेथॉन स्पर्धांचे प्रत्येक वर्षी आयोजन. त्यातून अनेक चांगले खेळाडू तयार झाले असून ते राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. त्याशिवाय प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्‍यक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.  

आगामी २ वर्षांत काय करणार?
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग, हमी भावाप्रमाणे भात खरेदी केंद्रे, इकोसेन्सेटिव्ह झोनला विरोध, गगनगड दुर्ग संवर्धन, पर्यटन विकास आराखडा, मतदारसंघातील क्रीडा संकुलांचे काम पूर्ण करण्यावर भर देणार. त्याशिवाय शहराशी संलग्न मतदारसंघ असल्याने शहरातील प्रश्‍नांचा पाठपुरावा करणार.

निधी किती आणला?
मंजूर निधी -    ३५० कोटी , खर्च -   १४० कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती -     ९९%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न -     ४४०

मतदारसंघ - कोल्हापूर दक्षिण - आमदार अमल महाडिक
तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीस प्रशासकीय मान्यता मिळवून सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर, चित्रनगरीसाठी बारा कोटींचा निधी, शास्त्री नगर क्रीडांगणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते दीड ते तीन मीटरने रुंद करण्यात आले. या व्यतिरिक्त टोल मुक्ती, हद्दवाढीस विरोध करून प्राधिकरणाची स्थापना अशी अनेक कामे केली आहेत. 

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सत्तर कोटी रुपयांचा इमारत निधी मंजूर आहे. शिवाय मतदारसंघातील सुमारे पस्तीस शाळांना ई लर्निंगसाठी डिजिटल क्‍लासरूम साहित्य दिले.

आगामी २ वर्षांत काय करणार?
कोल्हापूर शहरासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी अमृत सिद्धी पाणी योजना, सीपीआर व सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील सेवा सुविधांमध्ये वाढ करणार, औद्योगिक कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाण पूल, मतदारसंघातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा योजना, सेफ सिटी, शाळा इमारती, क्रीडांगणे अशी अनेक कामे प्रस्तावित आहेत.

निधी किती आणला?
मंजूर निधी - ५१८ कोटी १८ लाख,  खर्च -   ३०० कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती -     ९८%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -     ४५६

मतदारसंघ - हातकणंगले - आमदार डॉ. सुजित मिणचेकर

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
प्रामुख्याने रस्त्याच्या कामांना प्राधान्य दिले, वडगाव-हातकणंगले, रुई-इंगळी, संभापूर, मौजे तासगाव, कापूरवाडी मार्गे सावर्डे रस्त्याचे काम पूर्ण केले. वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्याची कामे प्रस्तावित, जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी शासनदरबारी पाठपुरावा, हुपरी पालिकेच्या मंजुरीसाठी शासनदरबारी पाठपुरावा.

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
 शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गेल्यावेळी अनेक शाळांना आमदार निधीतून संगणक दिले; शासनाच्या धोरणानुसार पहिली ते आठवी परीक्षा नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा होत आहे. त्यामुळे पुन्हा परीक्षा घ्यावी, यासाठी विधानसभेत आवाज उठवला, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान.

आगामी २ वर्षांत काय करणार?
वाहतूक व्यवस्था चांगली व्हावी, यासाठी विविध रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. हातकणंगले येथील प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करणार. किणी व कुंभोज येथे अद्ययावत रुग्णालय उभारणार. हातकणंगले आणि शिरोली पुलाची ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे, यासाठी पाठपुरावा.

निधी किती आणला?
मंजूर निधी -  ७५ कोटी , खर्च -     ५० कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती  -     ९५%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -     २४०

मतदारसंघ  - राधानगरी-भुदरगड - आमदार प्रकाश आबिटकर 

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
राज्यासाठी महत्त्वपूर्ण व गोव्याला जोडणाऱ्या शिवडाव - सोनवडे या घाटाचे सर्व अडथळे दूर करून काम सुरू. रेंगाळलेल्या व चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी ७५० कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी.

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
खेड्यापाड्यातील शाळांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न. शाळांना ई-लर्निंग सुविधा तसेच शैक्षणिक साहित्‍यांचे वाटप.

आगामी २ वर्षांत काय करणार?
  राज्यातील विस्ताराच्या दृष्टीने सर्वात मोठा हा मतदारसंघ आहे. यामध्ये १६०० किलोमीटरचे रस्ते आहेत. पैकी १३०० किलोमीटर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहेत. या रस्त्यांना निधीसाठी प्रयत्न करणार. सिंचनाचे सर्व प्रकल्प पूर्ण करणार. झापाचीवाडी, आप्पाचीवाडी, पडखंबे, निष्णप, सर्फनाला, नागनवाडी आदी प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. त्यांच्या पूर्णतेसाठी काम करणार.

निधी किती आणला?
राधानगरी-भुदरगड मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे केली.

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती  -     ९८%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -     ४५६

मतदारसंघ - चंदगड - आमदार संध्यादेवी कुपेकर 

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
प्रदूषणकारी एव्हीएच हद्दपार केला. गावागावांत रस्ते, पाणी, आरोग्य, निवाऱ्याची सोय आदी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा केला. शेतीसाठी वळण बंधारे व इतर योजना राबवल्या. पर्यटन विकासाला महत्त्व देऊन काम केले जात आहे. 

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
डोंगराळ, दुर्गम भागातील तसेच रस्त्याकडेच्या शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना संरक्षक कठडे बांधले. ई-लर्निग, संगणकीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. वंचित समाजाच्या मुलांसाठी संगणक पुरवले. निर्लेखन झालेल्या शाळांना नवीन खोल्या बांधून दिल्या. 

आगामी २ वर्षांत काय करणार?
उचंगी (ता. आजरा) प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट. संकेश्‍वर-आंबोली, शिनोळी-आंबोली आणि गारगोटी ते नागनवाडी हे मुख्य रस्ते रुंदीकरण करणार. चंदगड शहरासाठी रिंगरोड पूर्ण करून वाहतुकीची कोंडी दूर करणार.  
निधी किती आणला?
मंजूर निधी -   ६५ कोटी , खर्च -    ६५ कोटी 

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती  -    ८५%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -  ३६०

मतदारसंघ - शाहूवाडी-पन्हाळा - आमदार सत्यजित पाटील

तीन वर्षांत प्रमुख केलेले काम?
उखळूचा अंबाई धनगरवाडा अंधारमुक्त, संजय गांधी -श्रावणबाळ योजनेतील लाभार्थींना मोबदला वाढीसाठी अधिवेशनात प्रश्‍न, शाहूवाडी तालुका क्रीडा संकुलाचे काम मंजूर, इको झोन रद्द व्हावा यासाठी आंदोलन, जलयुक्त शिवार योजनेतून सर्वाधिक १७ गावांसाठी साडेदहा कोटींचा निधी आणला, वाड्यावस्त्या मुख्‍य रस्त्यांना जोडण्यासाठी भरीव निधी

शैक्षणिक क्षेत्रात काय केले?
मतदारसंघातील धोकादायक शाळा इमारती दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख तर नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी ५० लाखांचा निधी आणला, संगणकीकरणासाठी शाळांना मदत.

आगामी २ वर्षांत काय करणार?
उदगिरी व धोपेश्‍वर या धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थस्थळ दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा, विटा-मलकापूर-अणुस्कूरा व कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम मार्गी लावणार, पीक विमा योजनेत ऊस पिकाचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न.

निधी किती आणला?
शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात ३५० कोटींची कामे केली.

विधानसभेतील उपस्‍थिती?
विधानसभेतील उपस्थिती  -    ९६%
विधानसभेत विचारलेले प्रश्‍न  -     ३००

 

Web Title: Kolhapur News MLA Report card