मॉकड्रील मुळे प्रवाशांचा जीव टांगणीला...

file photo
file photo

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील डेपो मध्ये आग लागली आहे. यामध्ये ४ जण जखमी झाले असून, तत्काळ मदत पाहिजे, असा फोन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात, आरोग्य विभाग तसेच अग्निशमन दलाकडे खणाणले आणि बघता बघता हि बातमी आगी पेक्षा जास्त गतीने संपूर्ण शहरात पसरली. संपूर्ण बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला, प्रवासी सैरावैरा पळू लागले. नेमके कोणालाच काही कळेना. या मध्ये काही प्रवासी पडून जखमी झाले तर मुख्य रस्त्यावर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली. हे सर्व होत असताना ज्यांनी येथे लौकरात लौकर मदत घेऊन येणे गरजेचे होते. मात्र, तेच अर्धातासानंतर आले. आणि मॉकड्रील असल्याचे घोषित केले. मात्र, अनेकांचा जीव टांगणीला लावणारी यंत्रणेच्या या मॉकड्रीलमध्ये सामान्य प्रवासी पूर्ण भरडला गेला.

एखादी घटना घडली कि तत्काळ मदत मिळावी आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणावी. यासाठी तत्पर असणाऱ्या यंत्रणेची उजळणी घेणारी हि मॉकड्रील सपशेल फेल ठरली. घटना घडली पण यंत्रणा मात्र मागेच राहिली. अवघ्या ६०० मीटर अंतरावर असणारी अग्निशमनची गाडी ३० मिनिटांनी आली. २.५ किलोमीटर अंतरावरील आपत्ती व्यवस्थापन व साधारण २ किलोमीटरवर असणारी आरोग्य यंत्रणादेखील या नंतरच आली.

घटना घडल्याची माहिती मिळताच काही नागरिक मदतीसाठी धावले तर काही जण तेथून पळून गेले. यामुळे गोंधळ उडाला. धक्का लागून काही प्रवासी पडले तर काही जण आपले सामान टाकून पळून गेले. मात्र, हि एक कवायत असल्याचे समजताच प्रवाशांची यंत्रणेला शिव्यांची लाखोली वाहिली. महिला, लहान मुले यांची विशेष गर्दी आज बस स्थानकावर होती. दिवाळीच्या फराळाचे डबे, नवीन कपड्यांच्या पिशव्या स्थानकावर पसरले होते. हे सर्व गोळा करताना मात्र प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा कोल्हापूरच्या जनतेने अनुभवाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com