इचलकरंजीतील गुंड मुसाच्या टोळीला ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

इचलकरंजी -  शहापूर पोलिस हद्दीमधील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीवर रात्री उशिरा ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. गुन्हेगार गुंड्या ऊर्फ मुसा अब्दुलरजाक जमादार यांच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवंर ‘मोका’ लावण्यात आला.

इचलकरंजी -  शहापूर पोलिस हद्दीमधील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीवर रात्री उशिरा ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. गुन्हेगार गुंड्या ऊर्फ मुसा अब्दुलरजाक जमादार यांच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवंर ‘मोका’ लावण्यात आला.

याबाबत पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता दुजोरा दिला.
शिवाजीनगर पोलिसांनी मुसा जमादारला काल रात्री १ लाख २५ हजारांच्या फसवणुकीबरोबर जबरी चोरीप्रकरणी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. फसवणूकप्रकरणी पोलिसांनी जमादारच्या टोळीतील अविनाश टेके याला अटक केली होती. तो जामिनावर सुटला आहे. अन्य एका महिलेने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. मुसासह जुबेर कोठीवाले, इस्माईल मुजावर पसार झाले होते. रात्री मुसाला अटक केली आहे.

मुसा आणि त्याची टोळी जागेची व शेतजमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून, त्याच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करीत असे. त्याचबरोबर टोळीविरोधी हातकणंगले पोलिस ठाण्यामध्ये एक खून आणि तीन गंभीर स्वरूपाचे असे चार गुन्हे नोंद आहेत. गावभाग पोलिस ठाण्यात एक खून व दोन गंभीर स्वरूपाचे आणि शहापूर व शिवाजीनगर या दोन पोलिस ठाण्यंमध्ये फसवणुकीबरोबर जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी या टोळीविरोधी ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे व अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांच्यामार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. त्यांनी हा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला. रात्री उशिरा नांगरे-पाटील यांनी प्रस्तावास मंजुरी दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

 

Web Title: Kolhapur News Moka to the gangster Musa