गोंधा टोळीला मोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

कोल्हापूर - कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांची लूटमार करणाऱ्या सुरजा गोंधा गॅंगला मोका (संघटित गुन्हेगारी) लावण्यात आला. टोळीप्रमुख सूरज ऊर्फ कैलास सर्जेराव दबडे (वय २२, वाठार पैकी साखरवाडी), साथीदार गोविंद वसंत माळी (१९), ओंकार महेश सूर्यवंशी (१९, रा. दोघे कासेगाव) व विराज गणेश कारंडे (पाडळी दरवेश, ता. हातकणंगले) यांच्यासह दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संघटित गुन्हेगारी करून गोंधा गॅंगने पर्यटकांना लुटले. त्यांच्याकडून परिसरात वर्चस्ववाद सुरू झाला. गॅंगमधील गुन्हेगार धाकदपटशा दाखवून अनेकांवर दशहत माजवत होते. त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत असे तब्बल ३४ गुन्हे दाखल आहेत. याबाबत कोडोली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी टोळीविरोधात ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला. त्यानुसार पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव दाखल केला होता. त्याला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पहिलाच प्रस्ताव
शाहूवाडी उपविभागातील कोडोली पोलिस ठाण्यातून ‘मोका’अंतर्गत कारवाईचा पहिलाच प्रस्ताव पाठविण्यात आला होता. उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पन्हाळा, कोडोली परिसरात यामुळे दशहत कमी होण्यास मदत होणार आहे.

रात्रीत पाच दरोडे
गोंधा गॅंगने एकाच रात्रीत पन्हाळा, कोडोली, शिराळा, इस्लामपूर आणि पेठवडगाव येथे दरोडे टाकले होते. त्यानंतर त्यांची दहशत पुढे आली होती. पर्यटकांनाही ते लुटत असल्याची माहिती कोडोली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची पाळेमुळे खणून काढली.

Web Title: Kolhapur News Moka to Godha Gange