सीमाभागातील काडय्या-इरय्याच्या टोळीला ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोल्हापूर -  चेन स्नॅचिंग, दरोडे घालून गुन्हेगारी करणाऱ्या सीमाभागातील काडय्या-इरय्याच्या टोळीला मोका’ लावण्यात आला. नेसरी पोलिस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावावर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी पत्रकारांना दिली.

कोल्हापूर -  चेन स्नॅचिंग, दरोडे घालून गुन्हेगारी करणाऱ्या सीमाभागातील काडय्या-इरय्याच्या टोळीला मोका’ लावण्यात आला. नेसरी पोलिस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावावर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रिजवाना नदाफ यांनी पत्रकारांना दिली. काडय्या पुजारी, इरय्या मठपती हे दोघे ही टोळी चालवित होते. त्यापैकी काडय्या अद्याप फरार असून, इरय्या मात्र पोलिसांच्या हाती लागला आहे.

काडय्या शिवलिंगय्या पुजारी (वय ३२, रा. बस्तवाड, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), इरय्या चंदय्या मठपती (वय ३२, हेब्बाळ), गुलाबसाहब आप्पासाहब मुलतानी (५५, हंजानहट्टी, ता. हुक्केरी), कल्लाप्पा बाळाप्पा मेलमपट्टी (इंगळी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), मेहबूब मुलतानी (रा. हंजानहट्टी, ता. हुक्केरी), बसाप्पा ऊर्फ बसू गुरसिद्धाप्पा किल्लेदार (रा. हिरकल डॅम), परशराम ऊर्फ परसू केंचाप्पा (रा. बगुडीकट्ट, ता. गडहिंग्लज) या टोळीवर ‘मोका’ लावला आहे. यातील कल्लाप्पाही फरार आहे.

तब्बल पन्नासहून अधिक दरोड्याचे गुन्हे या टोळीवर आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक परिसरातील हे गुन्हेगार असून, ही टोळी रेकॉर्डवरील आहे. चेन स्नॅचिंग करणे, विना नंबरप्लेट मोटारसायकलीवरून चोऱ्या करणे, लुटणे, डोळ्यांत चटणी टाकून लूटमार करणे असे गुन्हे या टोळीवर दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.  हेब्बाळ-जलद्याळ येथील बॅंक ऑफ इंडिया शाखेतून काढलेली तीन लाख ७० हजार रुपयांची लूट चटणी डोळ्यांत टाकून या टोळीने लंपास केली होती. या तपासात नेसरी पोलिसांना ही टोळी मिळाली आहे. यातील पाच आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम ३(१),(२), ३(२), ३(४),३(५) ही वाढीव कलमे लावून परवानगी दिली असल्याचे नदाफ यांनी सांगितले. 

पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, गडहिंग्लज विभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही 
कारवाई झाली.

मठ, देवळातच मुक्काम
टोळीप्रमुख काडय्या, इरय्याचे वास्तव्य महाराष्ट्र, कर्नाटकात होते. ते फिरताना कधीही लॉजवर-हॉटेलवर राहिले नाहीत. ते मठ अथवा देवळातच राहत असल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाल्याचे नदाफ यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News MOka to Kadyya - Iryya gange