इचलकरंजीमध्ये एका महिलेवर मोका अंतर्गत कारवाई

राजेंद्र होळकर
मंगळवार, 27 मार्च 2018

इचलकरंजी - पोलिसांनी संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांना जरब बसविण्यासाठी मोका कायद्यातंर्गत अनेक पुरूष गुन्हेगारांवर अंमलबजावणी करण्यात आली. पण इचलकरंजीमध्ये एका महिला गुन्हेगारावर पहिल्यांदाच मोकातंर्गत कारवाई केल्याची घटना घडली आहे. या कारवाईने वस्त्रनगरीमध्ये महिला देखील गुन्हेगारीमध्ये असल्याचे उघड झाले आहे.

इचलकरंजी - पोलिसांनी संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्यांना जरब बसविण्यासाठी मोका कायद्यातंर्गत अनेक पुरूष गुन्हेगारांवर अंमलबजावणी करण्यात आली. पण इचलकरंजीमध्ये एका महिला गुन्हेगारावर पहिल्यांदाच मोकातंर्गत कारवाई केल्याची घटना घडली आहे. या कारवाईने वस्त्रनगरीमध्ये महिला देखील गुन्हेगारीमध्ये असल्याचे उघड झाले आहे.

शितल अविनाश टेके (रा.इचलकरंजी) असे तिचे नाव असून, ती रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या उर्फ मुसा अब्दुलरजाक जमादार (रा.शिवाजीनगर, कोरोची) यांच्या टोळीमध्ये ती स्वत: आणि तिचा पती अविनाश संजय टेके हे दोघेही काम करीत होते. या टोळीच्या कारनाम्याची दखल घेवून पोलीसांनी गुंड्या उर्फ मुसाच्या टोळीवर मोकातंर्गत कारवाई केली. त्यामध्ये टेके दाम्पत्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी कोणाचीही गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिल्याचे उघड झाले आहे. 

येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हेगार गुंड्या उर्फ मुसा जमादार यांच्यासह त्यांच्या टोळीतील अविनाश संजय टेके, त्यांची पत्नी शितल अविनाश टेके, जुबेर गुलाब कोठीवाले, इस्माईल मलिक मुजावर या पाच जणाविरोधी 1 लाख 25 हजार रुपयांच्या फसवणूकीबरोबर जबरी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या फसवणूक प्रकरणीतून अविनाश टेके हा जेलची काही काळ हवा खाऊन जामिनावर बाहेर आला आहे. त्यांची पत्नी शितल हिला न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविला आहे. तर गेल्या दोन महिन्यापासून गुन्हेगार गुंड्या उर्फ मुसासह जुबेर कोठीवाले, इस्माईल मुजावर हे तिघे जण पसार होते. पोलीसांनी गुंड्या उर्फ मुसा याचा शोध घेवून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. याच दरम्यान पोलिसांनी या टोळीच्या गुन्हेगारी कारनाम्याची दखल घेवून येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी या टोळी विरोधी मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

हा प्रस्ताव पोलीस उपाधिक्षक विनायक नरळे व अपर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाटगे यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. त्यांनी हा प्रस्ताव अंतिम मंजुरीकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास श्री. नांगरे-पाटील मंजुरी दिली.

त्यांचा जामिन अर्ज रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी
पोलिसांनी गुन्हेगार गुंड्या उर्फ मुसा जमादार यांच्यासह त्यांच्या टोळीतील पाच जणाविरोधी मोकातंर्गत कारवाई केली. त्यामुळे या टोळीतील अविनाश टेके हा फसवणूकीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. तसेच त्यांची पत्नी शितल हिने न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविल्याने बाहेर आहे. या टेके दाम्पत्याचा जामिन अर्ज रद्द करावा, अशी मागणी पोलिसांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. 

 

Web Title: Kolhapur News Moka to women in Ichalkaranji