इचलकरंजीतील जर्मनी टोळीला मोक्‍का - मोहिते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

इचलकरंजी - येथील शिवाजीनगर पोलिसांनी ‘जर्मनी टोळीवर मोक्‍काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. तो जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुढील कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या मंजुरीनंतर ‘जर्मनी गॅंग’विरोधी मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, त्यांचा भाऊ आदर्श जाधव ऊर्फ जर्मनी (दोघे लिगाडे मळा, दत्तनगर), साथीदार आकाश आण्णाप्पा भिलगुडे, नईम हसन कुकुटनूर, मनोज वामन शिनगारे (सर्व जण, रा. लिगाडे मळा), बजरंग अरुण फातले ऊर्फ बाचके (दत्त मंदिरशेजारी, इचलकरंजी), प्रशांत विनायक काजवे (रा. जवाहरनगर) हे सर्वजण ‘जर्मनी गॅंग’मध्ये आहेत. या टोळीचा म्होरक्‍या अविनाश जाधव ऊर्फ जर्मनी आहे. टोळीविरोधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्या विरोधातील काही गुन्हे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.

काही महिन्यांपूर्वी हे सर्वजण कारागृहाची हवा खाऊन जामिनावर बाहेर आले होते. बाहेर येताच या टोळीने खंडणीसाठी येथील जवाहरनगरातील व्यापाऱ्यावर खुनी हल्ला केला होता. संबंधित व्यापाऱ्याला सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाइकालाही गुन्हेगारांनी मारहाण केली होती. खंडणी न दिल्याने व्यापाऱ्यांच्या दुकानांची मोडतोड करून दुकानांतील रक्कम पळवून नेली होती. पोलिसांनी टोळीप्रमुख अविनाश जर्मनी ऊर्फ जाधवसह सहाजणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने ते सध्या कोल्हापुरातील कारागृहामध्ये आहेत. अविनाश जर्मनीचा भाऊ आदर्श जर्मनी अद्याप फरारी आहे. पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी या टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला.

Web Title: Kolhapur News Mokka to Germany group of Ichalkaranji