लोकसभेला सर्वजण मदत करतील - धनंजय महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांविषयी मला आदर आहे. त्यामुळे माझा हा स्वभाव पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वजण मला मदत करतील,’’ असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

कोल्हापूर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व नेत्यांविषयी मला आदर आहे. त्यामुळे माझा हा स्वभाव पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वजण मला मदत करतील,’’ असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केला.

‘‘महा पालिकेच्या राजकारणापासून आपण पहिल्यापासून अलिप्त राहिलो. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फुटल्याने पक्षाचे निश्‍चितच नुकसान झाले आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेत सध्या गाजत असलेल्या राजकारणाबद्दल विचारले असता श्री. महाडिक म्हणाले, ‘‘लोकसभेची निवडणूक झाल्यापासून मी महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. मला सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून थोडे बाजूलाच राहिलो आहे. याची कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनाही दिली होती. महापालिकेतील कोणत्याही नगरसेवकाने सांगावे, की मी त्यांच्या विरोधात प्रचार केला आहे. तसे मी केले असेल, तर आपण सांगू ते ऐकावयास तयार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीतही माझी हीच भूमिका होती. सध्या महापालिकेच्या राजकारणात एकमेकांना धक्‍के देण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी त्यात काय बोलणार; मात्र घडलेल्या घटनांशी माझा काहीही संबंध नाही आणि कोणाशी संपर्कही नाही. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे, असे मला वाटत नाही. महापालिकेच्या राजकारणात जे काही घडले; त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नुकसानच झाले आहे.’’

उमेदवारीबाबत मौन
आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले असता, त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आज या ठिकाणी मी राजकीय काही बोलणार नाही. अजून निवडणुकांना वेळ आहे; परंतु माझा स्वभाव पाहता मला खात्री आहे, की लोकसभा निवडणुकीत सर्वजण मला मदत करतील.’’

Web Title: Kolhapur News MP Dhananjay Mahadik Press