प्रश्‍न विचारा... संसद पाहा - खासदार महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍न विचारा आणि लोकसभेचे कामकाज अनुभवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून देशाचे धोरण निश्‍चित करणारे प्रश्‍न मागवून घेण्यात येणार आहेत. यातील उत्कृष्ट प्रश्‍नाची निवड करून त्या विद्यार्थ्यांना धनंजय महाडिक युवा शक्‍तीच्या खर्चाने संसदेचे कामकाज पाहण्याची संधी देणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिली. प्रश्‍न पाठविण्याची मुदत ५ मार्चपर्यंत आहे.

ते म्हणाले, ‘‘सध्याची तरुणाई जबाबदार आणि अभ्यासू आहे. त्यांची स्वत:ची ठोस मते आहेत. युवकांच्या या सकारात्मक ऊर्जेचा समाजासाठी आणि देशहितासाठी उपयोग व्हावा, तसेच ध्येय धोरणे ठरविण्यात त्यांचा थेट सहभाग व्हावा, त्यांची मते सरकारपर्यंत पोहचावीत, विद्यार्थी व सरकार यांच्यातील दुवा बनावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करत आहोत. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निश्‍चित करणारे प्रश्‍न पाठवायचे आहेत. यात आठवीच्या पुढील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रवेशिका शाळा व महाविद्यालयात आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येतील. 

समाज-देशहितासाठी...

  •  ध्येय धोरणे ठरविण्यात थेट सहभाग
  •  आठवीच्या पुढील विद्यार्थ्यांना परवानगी
  •  प्रवेशिका शाळा-महाविद्यालयात उपलब्ध 
  •  प्रश्‍नांच्या माध्यमातून समजणार तरुण मन
  •  प्रश्‍न निवडसाठी वीस जणांची समिती

विद्यार्थ्यांना नवीन काय वाटते, युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्‍न कोणते आहेत हे या उपक्रमाच्या माध्यमातून समजणार आहेत. आपण हे प्रश्‍न सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहोत. लोकसभेच्या आगामी अधिवेशनात ज्या प्रश्‍नांची चर्चा व्हावी, असे वाटते ते प्रश्‍न विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत पाठवावेत. प्रत्येक विद्यार्थ्याला एकच प्रश्‍न पाठविता येईल. यातील चांगल्या प्रश्‍नांची निवड करण्यासाठी वीस जणांची समिती नेमली आहे. ही समिती चांगल्या प्रश्‍नांची निवड करेल. त्याची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुकानिहाय विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले जाईल. 

शहरातील विद्यार्थ्यांचा गट स्वतंत्र आहे. प्रत्येक तालुक्‍यातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्यांना दिल्ली वारीची संधी मिळणार आहे. निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवास खर्चासह राहण्याचा, जेवणाचा खर्च महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वेळी रामराजे कुपेकर उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News MP Dhananjay Mahadik Press