उत्पन्न वाढवूनही शेतकरी पुन्हा कर्जबाजारीच - खासदार राजू शेट्टी

सागर कुंभार
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

रुकडी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन उत्पादन वाढविले, पण त्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभावच मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्न कमी मिळाले व तो पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची निवडणुकी पूर्वीची सरकारची घोषणा म्हणजे अच्छे दिनचे गाजरचं आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी माणगाव येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते. 
खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधानांचे बडे उद्योगपती तसेच शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. या चुकीच्या लोकांबरोबर आपण काही काळ राहिलो. पण तिथे जीव गुदमरु लागला. त्याचा पश्‍चाताप झाला म्हणूनच आत्मक्‍लेश यात्रा काढली आणि महात्मा फुले यांना अभिवादन करुन त्यांची माफी मागीतली.

देशातील मोठ मोठ्या उद्योगपतींनी शासकीय बॅंकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले. ते परदेशात पळाले, पण येथील शेतकऱ्यांना काही हजार रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी याच बॅंका आत्महत्या करण्यास भाग पाडत आहेत,

- राजु शेट्टी

शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. माणगावातील सुमारे दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि शेतकरी मेळावा या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. उपसरपंच राजू मगदूम यांचेही भाषण झाले.

कारखाना बंद झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत जाहीर केलेला दर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.

- प्रकाश आवाडे, माजी मंत्री  

राजू जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. जिन्ना पाटील (रुपाज) , जि. प. सदस्या वंदना मगदूम, अरुण मगदूम, सरपंच अश्विनी पाटील, अनिल पाटील, अविनाश माने, नंदकुमार शिंगे, आर. जे. पाटील, बाळासो गुरव उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News MP Raju Shetty comment