हे तर लबाडांचे सरकार - खासदार राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

कोल्हापूर - राज्य आणि केंद्रातील भाजप म्हणजे लबाडांचे सरकार आहे. या सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच बरी असल्याची प्रचीती येत आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथील सकाळ कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

कोल्हापूर - राज्य आणि केंद्रातील भाजप म्हणजे लबाडांचे सरकार आहे. या सरकारपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच बरी असल्याची प्रचीती येत आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले. येथील सकाळ कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार चांगले काम करत नसल्याने आम्ही भाजपबरोबर युती केली. या पक्षाकडून खूप अपेक्षा होत्या. शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी सरकार काही तरी चांगले निर्णय घेईल, शेतकऱ्याला ‘अच्छे दिन येतील’ अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळेच या सरकारमधून बाहेर पडलो. या सरकारने सर्वसामान्य जनतेला फसवले आहे.’’

राज्यातील दुधाचा प्रश्‍न या सरकारच्या नाकर्तेपणाचा कळस होता. सात-आठ महिने या प्रश्‍नाबाबत राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांना भेटलो, मात्र त्यांनी हा प्रश्‍न गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच आंदोलन करावे लागले, असे शेट्टी यांनी सांगितले. दुधाच्या आंदोलनाबाबत ज्यांनी आरोप केले त्यांचा गृहपाठ कच्चा असल्याचे सांगत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.’’ 

फसव्या जाहिराती
काँग्रेस सरकारने शेतमालाला चांगला भाव दिला आहे. उलट भाजपच्या काळात शेतमालाकडे दुर्लक्ष झालेले आहे. हमीभाव वाढवल्याच्या फसव्या जाहिराती सरकारकडून सुरू असून प्रत्यक्षा वस्तुस्थिती वेगळी आहे. २०१४-१५ सालाच्या दराचा आधार देऊन केलेली दरवाढ ही फसवी आहे. जुन्या काळातील मुनमजीप्रमाणे हिशेबात फसवण्याचा उद्योग हे सरकार करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

त्यांचा भाव ५५ रुपयांनीच वाढला 
उसाचा भाव २०० रुपये वाढवल्याने राजू शेट्टींना आता काम राहिलेले नाही. म्हणूनच ते दुधाकडे गेल्याची टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले. एफआरपीतील माहिती नसलेल्या मंत्री पाटील यांचा भाव फक्‍त ५५ रुपयांनीच वाढला असल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारची आणि पालकमंत्र्यांची लबाडी उघडी पडली आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Kolhapur News MP Raju Shetty comment