खासदार शेट्टी यांचे पाणीदार मजलेसाठी श्रमदान

राजकुमार चाैगुले
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोल्हापूर - मजले (ता. हातकणंगले) येथे लोकसहभागातून सुरु असलेल्या पाणी आडवा पाणी जिरवा कामास आज खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. श्रमदान करुन आपला सहभाग नोंदवला.  या  सामाजिक कार्यास सर्वोतपरी मदत करुन असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या सोबत स्वस्तीक पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

खासदार राजू शेट्टी म्हणाले, यापूर्वी मजले गावास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वन विभागाकडून झाडे लावण्यासाठी 12 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षामध्ये या कामासाठी 30 लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्ष्यता गावच्या नशिबी कायमची आहे. यावर कायमस्वरुपी उपाय करायच्या इराद्याने तरुण एकत्र येऊन पाणी फौडेशनच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेले हे काम कौतुकास्पद आहे. मजले गावचा आदर्श इतर गांवानी ही घ्यावा तसेच पाणी फौडेशनच्या या कार्यास शासकीय तसेच वैयक्तीक मदत करण्यास कटीबध्द असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: Kolhapur News MP Raju Shetty work for Panidar Majale