अभियंता नियुक्तीपेक्षा भरती परीक्षेत रस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

कोल्हापूर - महावितरण कंपनीने दीड वर्षापूर्वी सहाय्यक अभियंतापदासाठी भरती परीक्षा घेतल्या. त्यातील २०३ उमेदवारांची प्रतीक्षा यादी अद्यापही शिल्लक आहे. असे असताना कनिष्ठ (सहाय्यक) अभियंता भरती परीक्षेसाठी मंत्रालयीन स्तरावर प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे. 

एका उमेदवाराकडून ५०० रुपये परीक्षा शुल्क घेऊन होणारी प्रक्रिया अत्यंत पारदर्शी होते. याबाबत वादच नाही. पण, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्‍त्या पूर्णपणे देण्यापूर्वीच दुसरी परीक्षा घेण्यासाठी ठेका देण्याची घाई ‘महावितरण’मधील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. 

सहाय्यक अभियंता परीक्षा उत्तीर्ण प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला, तरीही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ठोस उत्तर मिळालेले नाही. आणि व्यवस्थापकीय संचालकांनी बेदखल केले. अशा कृतीने परीक्षा बोर्डाचा लाखो रुपयांचा लाभ करून देण्यासाठी ‘महावितरण’मधील उच्च अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा संशय बळावला आहे.  

२०१५ मध्ये महावितरण कंपनीने ८२६ जागांसाठी सहाय्यक अभियंतापदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यासाठी जवळपास २८ हजार अर्ज आले. त्यासाठी ५०० रुपये परीक्षा शुल्क प्रत्येक उमेदवाराकडून घेण्यात आले. यातून परीक्षा घेणाऱ्या बोर्डाचा लाभ झाला. शुल्कातून एक कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. परीक्षा घेण्यासाठी विविध शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील संगणक वापरले गेले. तीन तासांची परीक्षा झाली. त्यासाठी महाविद्यालयाचे स्टाफ प्राध्यापक वापरले गेले. एका उमेदवारामागे महाविद्यालयाला शंभर-दीडशे रुपयांची रक्कम दिली गेली. तरी उरलेले पैसे बोर्डाला गेले. बोर्डाच्या परीक्षा योग्यरीत्या पारदर्शकपणे परिपूर्ण झाल्या. 

निकाल ‘महावितरण’कडे आला. त्यानंतर गेल्या वर्षीपर्यंत २१३ उमेदवारांना नियुक्‍त्या मिळाल्या. २०३ उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत. 

अशात ‘महावितरण’च्या जागा भरण्यात अनुशेषानुसार इतर मागासवर्गातील ६१ जागा, अनुसूचित जातीतील ५० जागा, इतर मागासप्रवर्गातील चार जागांवर नियुक्‍त्या झाल्याच नसल्याचे सांगण्यात येते. याशिवाय, गेल्या दीड वर्षात निवृत्त झालेल्या अभियंत्यांच्या जागा खुल्या आहेत. अशा एकूण रिक्त पदांची संख्या ३०० च्या पुढे आहे. म्हणून २०३ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अजूनही संधी मिळू शकते. मात्र, दीड वर्ष झाले तरी या जागा भरलेल्या नाहीत. असे असताना नवीन परीक्षेची तयारी सुरू आहे. यातून व उच्च अधिकाऱ्यांना बोर्डाचे भले करून देताना सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार आहे का? 

एकमेकांकडे बोट दाखविले जाते 
या प्रतीक्षा यादीतील २०३ उमेदवारांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व ‘महावितरण’मधील मानव संसाधन अधिकारी, तसेच व्यवस्थापकीय संचालक अशा सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केला आहे. पण, प्रत्येकाने एकमेकांकडे बोट दाखविले. मात्र, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती मिळणार की नाही, याविषयी कोणतीच शाश्‍वती उमेदवारांना मिळालेली नाही.

Web Title: kolhapur news MSEB Engineer Appointment