उच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हीलेज’

उच्चशिक्षित बनवताहेत मुढेवाडीला ‘ड्रीम व्हीलेज’

आटपाडी - गाव पांढरीची ओढ असलेले तरुण केवळ उच्चशिक्षित बनून पैसे मिळवून समाधानी नाहीत. अशा ‘डोन्ट बी संतुष्ट’ ५०० वर यंग बिग्रेडने हातात हात घालून स्वतःच्या खिशातील पैशांतून समाज परिवर्तन, विकासाचे काम माणदेशमधील मुढेवाडीत दीड वर्ष सुरू केले आहे. देश, जगभर पसरलेल्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या ऊर्जेतून तालुक्‍यातील मुढेवाडीत ‘ड्रीम व्हीलेज’ साकारत आहे.

खेड्यातून अनेक तरुण शिक्षण घेऊन सांगलीपासून पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकत्ता या देशातील शहरासह अमेरिकेसह युएएस, टेक्‍सास, व्हीसटन, दुबई आदी देश व शहरात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. गावपांढरीच्या ओढीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र बनले. गावच्या ऋणातून मुक्‍त होण्यासाठी विचारमंथन सुरू झाले. अभिनेते, उच्चपदस्थ, आय. ए. एस. अधिकारी, शासकीय अधिकारी, उद्योगपती, व्यावसायिक, अभियंते, डॉक्‍टर, वकील, समाजसेवकांची मोट बांधली.

कॉन्सफरन्सवर अनेक बैठका झाल्या. त्यातून तीन एप्रिल २०१७ मध्ये ‘ड्रीम व्हीलेज फाऊंडेशन’ चा जन्म झाला. या समूहात दोन, चार नव्हे तर तब्बल पाचशेवर उच्चशिक्षित सहभागी झाले. त्यांच्या कष्टाच्या पैशातून मुढेवाडीला आदर्श बनवण्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले.

झालेले उपक्रम

  •  गावचा सर्व्हे करून प्रकल्प तयार.

  •  प्रबोधन आणि जागृतीपर बैठका.

  •  तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या भेटी.

  •  सुरक्षा रक्षकासह केबिन स्वागत कमात अंतिम टप्प्यात.

  •  अंतर्गत छोटे रस्ते पूर्ण.

  •  गाव चिलारमुक्‍त केले.

नियोजित उपक्रम 

  •  भुयार गटार योजना 

  •  पाणी आडवा-पाणी जिरवा उपक्रम.

  •  व्यायामशाळा आणि क्रीडांगण

  •  अत्याधुनिक ग्रामसचिवालय, 

  •  सुसज्य ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था.

  •  बॅंक, एटीएम, सीसीटीव्ही, वाय-फाय.

  •  सौर ऊर्जा प्रकल्प.

तीन टप्प्यात गाव विकास केला जाणार आहे. ड्रोन कॅमेऱ्याने आराखडा तयार केला गेला. पहिल्या टप्प्यात सुविधा व गरजा, दुसऱ्या टप्प्यात सौंदर्य आणि सुशोभीकरण; आणि त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षा रक्षक केबिनसह स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशी देखणी कामान राज्यात क्‍वचित पहायला मिळेल. पहिल्या तीन महिन्यांत तीसवर उपक्रम राबवले. सव्वाशे प्रकारची  कामे होणार आहेत.

गाव पांढरीची ओढ असलेल्या तरुणांच्या सहभागातून मुढेवाडी ‘आदर्श’ बनवण्याचा निर्धार केला आहे. कामही सुरू केले आहे.
-  महेश पाटील 

अध्यक्ष, ड्रीम व्हीलेज फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com