मुख्याध्यापकांना जाचक ठरणारा अध्यादेश मागे घेणार - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  मुख्याध्यापकांना जाचक अध्यादेश सातत्याने बदलणार नाहीत, याची दक्षता राज्य शासन घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनात दिली.

कोल्हापूर -  मुख्याध्यापकांना जाचक अध्यादेश सातत्याने बदलणार नाहीत, याची दक्षता राज्य शासन घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनात दिली.

तीन दिवसांच्या राज्यस्तरीय अधिवेशनास प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या मैदानावर सुरवात झाली. याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसीना फरास, अध्यक्ष संदिपान मस्तूद, महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व व स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील, व्ही. जी. पोवार, अरुण थोरात, सुभाष माने आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी अधिवेशनासाठी एक लाख रुपये जाहीर केले. 

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘अधिवेशनासाठी आपण २५ लाखांची मागणी केली. मला वाटले २५ कोटी मागता की काय? दरवर्षी होणाऱ्या अधिवेशनासाठी २५ 
ऑलाखांची घोषणा करीत आहे. मी विद्यार्थी आणि शिक्षक चळवळीतून पुढे आल्याने शिक्षकांसह मुख्याध्यापकांचे नेमके प्रश्‍न ठाऊक आहेत. संघटनेसाठी घरदार सोडून काम केले. २००८ तसेच २०१४ ला पदवीधर मतदारसंघातून विजयी झाल्याने शिक्षकांचे प्रश्‍न तोंडपाठ आहेत. विनाअनुदानित हा शब्द जाण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याचे थोडेफार श्रेय मलाही जाते. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. वीस टक्‍क्‍यांचे अनुदान शंभर टक्‍क्‍यांपर्यंत आणले जाईल.’’

मंत्री खोत म्हणाले, ‘‘शिक्षक, मुख्याध्यापक पैशासाठी नव्हे, तर भावी पिढी घडविण्याचे काम करतात. स्पर्धेच्या युगात पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दादांना प्रश्‍नांची जाण आहे. ते निश्‍चितपणे न्याय देतील. तुम्ही पगारी आहात आणि आम्ही बिनपगारी एवढाच फरक. अनेक जण संप करत आहेत. आम्ही पण करू का, एवढेच सांगायचे बाकी आहे.’’

विजयसिंह गायकवाड म्हणाले, ‘‘मुख्याध्यापकांबाबत शासन दुजाभाव करत आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्‍न गंभीर आहे. आरटीईची अंमलबजावणी करा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुणवत्ता हवी आहे. त्यासाठी सुविधा मात्र शासनाने द्यायला हव्यात.’’

डी. बी. पाटील यांनी संघासह संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. अध्यक्ष संदिपान मस्तूद यांनी जिव्हाळ्याच्या मागण्यांचा उल्लेख केला. स्मरणिका, ग्रंथाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. शीतल हिरेमठ, दत्तात्रय लवटे, प्राजक्ता पाटील, राजेंद्र मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Kolhapur News Mukhyadyapak Sangh Mahamandal convention