पत्नीचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

ढेबेवाडी - पत्नीच्या डोक्‍यात दांडक्‍याने मारहाण करून तिचा खून केल्याचा प्रकार काल रात्री साडेसातच्या सुमारास जौंजाळवाडी (ता. पाटण) येथे घडला. कल्पना किसन चोरगे (वय 47) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर तिचा पती किसन शंकर चोरगे (52) याने घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी दरवाजा तोडून त्याला वाचविले. सातारा येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

पोलिसांनी सांगितले, की येथून सुमारे सात किलोमीटरवरील डोंगरमाथ्यावर वसलेल्या जौंजाळवाडी येथील किसन चोरगे याचे मूळ गाव गलमेवाडी (ता. पाटण) आहे. पत्नी कल्पना यांना भाऊ नसल्याने ते वतनावर जौंजाळवाडीत राहण्यास आहेत. शेती व मजुरीवर या दांपत्याची उपजीविका चालते. त्यांना एक विवाहित मुलगी असून, मुलगा मुंबईत एका कंपनीत नोकरी करतो. काल रात्री साडेसातच्या सुमारास किसनने कल्पना यांच्या डोक्‍यात दांडक्‍याने बेदम मारहाण केली. त्या घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्याने घराचा दरवाजा बंद करून गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडण्यासाठी त्याला हाका मारल्या. मात्र, प्रतिसाद देत नसल्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि गळ्याचा फास सोडवून त्याला खाली घेतले. शिवाजी रामचंद्र जौंजाळ यांनी वर्दी दिली. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: kolhapur news murder case

टॅग्स