तरुणाच्या तोंडावर फरशी घालून खून करण्याचा प्रयत्न 

राजेंद्र होळकर
मंगळवार, 20 मार्च 2018

इचलकरंजी -  येथील डेक्कन चौकामध्ये अज्ञाताने एका तरुणाच्या तोंडावर फरशी मारून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. अशोक राजाराम चव्हाण ( वय ४२, रा. जयभीमनगर, इचलकरंजी ) असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला सांगली येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.

जखमी अशोक चव्हाण हा हाताला मिळेल ते काम करतो आहे. तो आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास येथील डेक्कन चौकात आला होता. याच दरम्यान अज्ञाताने त्याच्या डोक्यात फरशी घालुन त्याच्यावर खूनी हल्ला केला. यावेळी चव्हाण याने हल्लेखोराला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोराने त्याच्या तोंडावर फरशी मारली. त्यामुळे त्याच्या तोंडाचा जबडा तुटला गेल्याने गंभीर जखमी झाला.

त्याचा जबडा तुटल्याने त्याला बोलता येत नसल्याने हा खूनी हल्ला कोणी व कोणत्या कारणावरुन केला हे समजू शकले नाही. जखमी चव्हाण याला येथील आयजीएम रूग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur News Murder incidence in Ichalkaranji