गैरसमजुतीतून मुस्लिम बोर्डिंगमध्ये तणाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या निमित्ताने बोलाविण्यात आलेला मेळावा हा एमआयएमचा मेळावा असल्याच्या गैरसमजुतीतून आज एकच गोंधळ उडाला. वीस ते पंचवीस तरुणांनी घोषणाबाजी केल्याने येथे तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी करून घोषणाबाजी करणाऱ्या सागर साखरे यास ताब्यात घेतले. महापौरांचे पुत्र आदिल फरास हे साखरे यांच्यापाठोपाठ आल्याने गोंधळात आणखी भर पडली.

कोल्हापूर - मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या निमित्ताने बोलाविण्यात आलेला मेळावा हा एमआयएमचा मेळावा असल्याच्या गैरसमजुतीतून आज एकच गोंधळ उडाला. वीस ते पंचवीस तरुणांनी घोषणाबाजी केल्याने येथे तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिसांनी मध्यस्थी करून घोषणाबाजी करणाऱ्या सागर साखरे यास ताब्यात घेतले. महापौरांचे पुत्र आदिल फरास हे साखरे यांच्यापाठोपाठ आल्याने गोंधळात आणखी भर पडली.

आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल मैदानालगतच्या सभागृहात विरोधी गटाने निवडणुकीसंबंधी मेळावा आयोजित केला होता. बऱ्याच वर्षांनी मुस्लिम बोर्डिंगची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीविषयी कमालीची उत्कंठा आहे. २४ सप्टेंबरला मतदान होत आहे. मोहमेडन एज्युकेशन सोसायटीवर सत्तारूढ गटाचे वर्चस्व आहे. त्यात इतरांना संधी दिली जात नसल्याचा आरोप करून विरोधी गटाने दंड थोपटले आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास मेळाव्यास सुरवात झाली. प्रवेशद्वारातच प्रत्येकाला नोंदणी सक्तीची होती. परिवहन समिती सभापती नियाज खान, रियाज सुभेदार, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, हुसेन भालदार. के. एम. बागवान, ॲड. मुनाफ मणेर, हिदायत मणेर, यासीन बागवान, रियाज सौदागर, फारूक पठाण, झाकीर कुरणे, सलीम बागवान, सलील मुल्ला आदी या वेळी उपस्थित होते. प्रमुख मंडळीची भाषणे सुरू असताना साडेबाराच्या सुमारास तरुणांचा अचानक गट सभागृहाच्या दिशेने घोषणा देत आला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. एमआयएमचा धिक्कार असो, मेळावा घेणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा सुरू झाल्या. 

साखरे यांची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. निवडणुकीचा मेळावा असून, एमआयएमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला. साखरे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना खात्री झाल्यानंतर तणाव निवळला. साखरे यांनी व्यासपीठावर त्यांना सोशल मीडियाद्वारे येथे एमआयएमचा मेळावा असल्याचा संदेश मिळाला होता, त्यामुळे आपण येथे आल्याचे सांगितले. साखरे यांच्यापाठापोठ मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी व महापौर हसीना फरास यांचे पुत्र आदिल येथे आल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली.शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रविण चौगले यांनी साखर ेयास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यास आदिल फरास  यांनी विरोध केला.मात्र चौगले यांनी साखरे यास सभागृहाच्या बाहेर आणत पोलिस गाडीतून नेण्याचा प्रयत्न केला असता फरास यांनी पुन्हा विरोध केला. अखेर फरास यांच्या गाडीतूनच साखरे शाहुपुरी ठाण्यात गेले.तेथे त्यांना समज देवून सोडण्यात आले.

सत्तारूढ गटावर विरोधकांचा आरोप
निवडणुकीचा मेळावा असूनही तो एमआयएमचा असल्याची अफवा सत्तारूढ गटाने पसरविल्याचा आरोप विरोधी गटाने केला. दरम्यान शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही एमआयएमचा मेळावा असल्याची बातमी लागली होती. 

Web Title: kolhapur news Muslim boarding