पिस्तूल लावून चर्चेला बसू नका - एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

कोल्हापूर - इचलकरंजीतील लोकांना प्यायला पाणी मिळावे, यात दुमत नाही. आमच्या छातीला पिस्तूल लावून चर्चेला बसू नका, असा टोला प्रा. एन. डी. पाटील यांनी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांचे पती अशोक स्वामी यांना लगावला, तर मलमूत्र असणारे पाणी पिऊन आम्ही जगायचे का? असा सवाल अशोक स्वामी यांनी केला.

दानोळीतून वारणा नदीतून पाणी उपसा करून इचलकरंजीला नेले जाणार आहे. याला दानोळी ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर दानोळीच्या शेतकऱ्यांशी प्रा. एन. डी. पाटील यांनी चर्चा करावी, अशी भूमिका नगराध्यक्षा अलका स्वामी, उपाध्यक्षा सरिता आवळे, अशोक स्वामी, शशांक बावचकर यांच्या शिष्टमंडळाने प्रा. पाटील यांची निवासस्थानी भेट घेऊन मांडली. 

नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या, ‘‘इचलकरंजीमधील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.’’ उपनगराध्यक्षा सरिता आवळे, मनोज हिंगमिरे, अजित जाधव, विपूल चोपडे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News N D Patil comment