नांदेड पोलिस भरती घोटाळाः पेपरफुटीची पाळेमुळे कोल्हापुरात

लुमाकांत नलवडे
सोमवार, 14 मे 2018

कोल्हापूर - नांदेड पोलिस भरती लेखी परीक्षेत पेपर कोरा टाकूनही ‘ए’ ग्रेड मिळविणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये कोल्हापूरच्या दोघांचा समावेश आहे. ते दोघे एका पोलिस उपनिरीक्षकाशी संबंधित असलेल्या संस्थेतील आहेत. त्यांच्या मुळापर्यंत पोचण्याचे काम नांदेड पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे ‘नांदेड टू कोल्हापूर व्हाया कोकण’ असा या घोटाळ्याचा प्रवास असल्याचीही माहिती पुढे आली आहे. नुकतेच नांदेड पोलिसांनी कोनवडे (ता. भुदरगड) येथून अनिल गुरव याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रियेत लेखी आणि शारीरिक चाचणी झाली. यामध्ये काही तरुणांना ‘ए’ ग्रेड मिळाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे उमेदवार काहीच पेपर लिहीत नव्हते, त्यांना ‘ए’ ग्रेड कसा मिळाला, याचा उलट तपास सुरू झाला तेव्हा संबंधित तरुणांनी पेपर कोरे दिले होते. त्यानंतर सांगली आणि पुण्यातील दोन खासगी एजन्सीज्‌कडून ते तपासण्यात आले. तेथे ते लिहून या वेळी त्यांना ‘ए’ ग्रेड मिळाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. पोलिस अधीक्षकांनी याची सविस्तर माहिती घेतली. तेव्हा त्यांना हे रॅकेट पोलिस अधिकाऱ्यांकडूनच तयार करण्यात आल्याची माहिती पुढे आली. 

या प्रकरणी पोलिसांनी जालना, बुलडाणा, औरंगाबाद येथील काही पोलिस अधिकारी या रॅकेटमध्ये असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यांना अटकही झाली आहे. याच्या मुळापर्यंत गेल्यानंतर कोल्हापुरातील ओंकार गुरव हाही विद्यार्थी परीक्षेस बसला होता. त्याला अटक केल्यावर त्याच्याकडून रॅकेटमध्ये त्याचा भाऊ अनिल गुरवचे नाव पुढे आले.

यातून दोन दिवसांपूर्वीच नांदेड पोलिस कोल्हापुरात आले होते. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने कोनवडे येथून अनिल गुरवला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता. १५)  पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे नांदेड पोलिसांनी सांगितले.

कोनवडे येथील अनिल गुरवला नांदेड पोलिस 
घेऊन गेले आहेत, तपासकामासाठी त्याला घेऊन जात असल्याची नोंद गारगोटी पोलिस ठाण्यात झालेली आहे. संबंधित पोलिसांनी त्यांच्या नावाचीही नोंद डायरीत केली आहे.
- रमेश पाटील,
पोलिस उपाधीक्षक, गडहिंग्लज

कोनवडे येथील अनिल गुरवला नांदेड पोलिस 
घेऊन गेले आहेत, तपासकामासाठी त्याला घेऊन जात असल्याची नोंद गारगोटी पोलिस ठाण्यात झालेली आहे. संबंधित पोलिसांनी त्यांच्या नावाचीही नोंद डायरीत केली आहे.
- रमेश पाटील, पोलिस उपाधीक्षक, गडहिंग्लज

Web Title: Kolhapur News Nanded Police recruitment scam