स्वतः जगणारा अन् मालकाला जगविणारा..नंदीबैल (व्हिडिआे)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

नंदी बैलाचा भार स्वतःच्या मांडीवर पेलवतात. माणसाचं आणि जनावरांचं नातं जगणं बळकट करण्याला कस पुरक ठरतं याचा संदेशही देतात. तेव्हा आपसूकच आया-बायांच्या मनातील श्रध्देला उधान येतं तस बैलांचं पुजन होतं. माहिती तंत्रज्ञानाच्या गदोरोळात दुर्मिळ होत चाललेली नंदीबैलाची खेळाची लोककला अधिक समृध्द होताना....

हो ला हो जो म्हणतो त्याला नंदीबैल म्हणण्याची एक पद्धत आहे. पण वास्तवात या नंदी बैलाचं जगं आणि त्याचे जगणं वेगळच आहे. हा बैल जरूर मालकाची आज्ञा पाळतो. त्यानं जसं शिकवलयं तशीच प्रतिक्रिया व्यक्त करतो. त्याच असं वागण म्हणजे मालकाशी निष्ठाच असते. तो केवळ निष्ठाच जपत नाही, तर आपल्या मालकाचीही उपजिविका करतो. नंदीबैल हे महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक परंपरेचे एक सुंदर प्रतिक आहे. बैलासारखा एका जनावराची निगा त्याचा मालक कशी ठेवतो. आणि तोच बैल आपल्या अभिनयाच्या कलेवर मालकाच्या उदरनिर्वाहाला कसा हातभार लावतो हेच सांगणारा बी. डी. चेचर यांचा हा व्हिडिआे...

आपल्या परंपरा जोपासत ढंगदार जगणं जगणारे नव्या पिढीतील हे शिलेदार. नंदी बैलाला बोलतं करतात. नंदी बैलाचा भार स्वतःच्या मांडीवर पेलवतात. माणसाचं आणि जनावरांचं नातं जगणं बळकट करण्याला कस पुरक ठरतं याचा संदेशही देतात. तेव्हा आपसूकच आया-बायांच्या मनातील श्रध्देला उधान येतं तस बैलांचं पुजन होतं. माहिती तंत्रज्ञानाच्या गदोरोळात दुर्मिळ होत चाललेली नंदीबैलाची खेळाची लोककला अधिक समृध्द होताना....(व्हीडीओ, संकलनः बी. डी. चेचर, कोल्हापूर)

Web Title: Kolhapur News nandibull special video

टॅग्स