#SaathChal कोल्हापूरकरांची प्रतिपंढरपूर वारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

कोल्हापूर - येथील श्री ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा समितीतर्फे यंदाही आषाढी एकादशीदिनी भव्य पायी दिंडी सोहळा होणार आहे. सलग पंधराव्या वर्षी हा सोहळा सजणार असून, चांदीची पालखी, उभे व गोल रिंगण आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल. कोल्हापूर ते नंदवाळ अशा अकरा किलोमीटरचा हा सोहळा कोल्हापूरकरांची प्रतिपंढरपूर वारी म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान, या सोहळ्याच्या तयारीसाठी बैठक झाली. 

२३ जुलैला सकाळी सातला मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरापासून पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ होईल. बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक, संकल्प सिद्धी मंगल कार्यालयामार्गे दिंडीचे नंदवाळकडे प्रस्थान होईल. खंडोबा तालीम येथे उभे, तर संकल्पसिद्धी कार्यालयाजवळ गोल रिंगणाचा सोहळा होईल. तत्पूर्वी, २२ जुलैला दुपारी तीनला नगरप्रदक्षिणा होईल. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वारमार्गे पुन्हा मिरजकर तिकटी, शाहू बॅंकेमार्गे सासणे इस्टेट असा नगरप्रदक्षिणेचा मार्ग राहील. एम. पी. पाटील-कावणेकर, आनंदराव लाड महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा होईल. दरम्यान, आज झालेल्या बैठकीला बाळासाहेब पोवार, दीपक गौड, सुरेश जरग आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Nandwal Prati Pandharpur wari