थर्टी फर्स्टला मस्ती नको - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

कोल्हापूर - नवीन वर्षाचे स्वागत करताना एन्जॉय करा, पण मस्ती नको, असा सल्ला आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना दिला. "थर्टी फर्स्ट'च्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हा सल्ला दिला आहे.

कोल्हापूर - नवीन वर्षाचे स्वागत करताना एन्जॉय करा, पण मस्ती नको, असा सल्ला आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना दिला. "थर्टी फर्स्ट'च्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हा सल्ला दिला आहे.

थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ल्यावर विनापरवाना होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई होणार आहे. पार्टीतील डॉल्बीला बंदी असून, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई होईल. पन्हाळ्यासह महाबळेश्‍वर, लोणावळ्याच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त असणार आहे. काही ठिकाणी होमगार्ड ही मदतीला असणार आहेत. नववर्षाचे स्वागत जरूर करा, पण मस्ती करू, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, की कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे नववर्ष स्वागत व विविध कार्यक्रमांसाठी 31 डिसेंबरला मोठी गर्दी होते. त्यावरील नियंत्रणासाठी, नागरिकांना सुरक्षित वातावरणात नववर्ष स्वागत करता यावे, यासाठी पोलिसांचे नियोजन तयार आहे. लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी, पन्हाळा येते पोलिस चोख बंदोबस्त ठेवणार आहे. रस्त्यांवर दारू पिऊन गाडी चालवणे अथवा दारू पिऊन गोंधळ घालणारांवर तेथेच कारवाई होईल.

बदलीची अफवा...
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याची अफवा आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मात्र वस्तुस्थिती पाहता त्यांची बदली झालेली नाही. त्यांच्या ठिकाणी सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाल्याची ही चर्चा होती. या दोन्ही पोस्ट अफवाच ठरल्या. बदल्यांच कोणतेही आदेश शासनस्तरावर झालेले नाहीत.

38 गॅंगवर मोका, आर्थिक स्रोत तपासणार
परिक्षेत्रातील 38 गुन्हेगारांच्या गॅंगला मोका लावण्यात आला आहे. त्यांचे आर्थिक स्रोत तपासण्यात येणार आहेत. त्यांच्याकडील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था चांगली राखता येणार आहे, असेही श्री.नांगरे-पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news nangare patil talking on thirty first