डॉल्बी मुक्‍त गणेशोत्सवाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

कोल्हापूर - पक्षाच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी आपापली कार्यकारिणी येत्या आठ दिवसात जाहीर करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले. गणेशोत्सव जवळ आला असूत मंडळानी डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आर. के. पोवार यांनी केले. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व विविध विभागांच्या अध्यक्षांची पक्षाच्या शिवाजी स्टेडियम येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. 

प्रत्येक सेलच्या अध्यक्षांनी आपली कार्यकारिणी जाहीर करावी. तसेच सध्या संघटनात्मक पातळीवर व्यापक काम सुरू आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन करण्यात आले. 

राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार म्हणाले, ""गणेशोत्सव डॉल्बीमुक्‍त करून कायद्याच्या चाकोरीत राहून आनंदाने साजरा करण्याबाबत कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील मंडळांना आवाहन करावे.'' 

बैठकीस महिला शहर अध्यक्ष जहिदा मुजावर, अमोल देशिंगकर, सुहास साळोखे, जितेंद्र कांबळे, अंकिता राऊत, राजेश शिंदे, सुनील देसाई, प्रसात उगवे, राज पोवार, गणपतराव बागडी, धर्मराज चौगुले, महादेव पाटील, निरंजन कदम, नागेश जाधव, राजेंद्रड बीडवे, बाबा जगताप आदी उपस्थित होते. आभार अनिल कदम यांनी मानले.

Web Title: kolhapur news ncp ganeshotsav Dolby

टॅग्स