शेट्टींचा आत्मक्‍लेश अन्‌ राष्ट्रवादीत शीतयुद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

आमदार हसन मुश्रीफांनी यात्रेला पाठिंबा दिल्याने निवेदिता माने नाराज
कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्‍लेश यात्रेला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. तसा या दोन नेत्यांतील वाद दोन वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. श्री. शेट्टींच्या आंदोलनाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला आहे. 

आमदार हसन मुश्रीफांनी यात्रेला पाठिंबा दिल्याने निवेदिता माने नाराज
कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्‍लेश यात्रेला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. तसा या दोन नेत्यांतील वाद दोन वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. श्री. शेट्टींच्या आंदोलनाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला आहे. 

श्री. मुश्रीफ यांची पक्षात एकाधिकारशाही असल्याचा आरोप माने गटाचा आहे. यावरून श्रीमती माने यांचे पुत्र सत्वशील यांनी यापूर्वीच त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. दुसरे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनीही श्री. मुश्रीफ हे माने गट संपवत असल्याचे म्हटले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हातकणंगले तालुक्‍यात श्रीमती माने व त्यांच्या गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केली. या निवडणुकीत माने गटाला पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाचे म्हणजे धैर्यशील यांच्या पत्नीचा पराभवही ते वाचवू शकले नाहीत. आता अलीकडे तर मुश्रीफ विरुद्ध माने गटात या ना त्या कारणाने मतभेद आहेत. 

श्रीमती माने या जिल्हा बॅंकेच्या संचालिका आहेत. श्री. मुश्रीफ त्याच बॅंकेचे अध्यक्ष आहेत. एकत्र असले तरी त्यांच्यात फारसे सख्य नाही, हे दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यावेळी दिसून आले. 

श्री. शेट्टी यांच्या आत्मक्‍लेश यात्रेला श्री. मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला. याच शेट्टी यांच्याकडून श्रीमती माने लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या, त्यामुळे त्यांचा शेट्टींवर राग आहे. आपल्या विरोधकाच्या आंदोलनाला आपल्याच पक्षाचे नेते पाठिंबा देतात, याची सल श्रीमती माने यांना आहे. त्यातूनच त्यांनी श्री. तटकरे यांच्यासमोरच श्री. मुश्रीफ यांना टोला लगावला. मुश्रीफ यांचा साखर कारखाना आहे. त्यावर श्री. शेट्टी यांनी मोर्चा काढू नये, म्हणूनच त्यांना श्री. मुश्रीफ यांनी पाठिंबा दिल्याची कोपरखळी श्रीमती माने यांनी मारून शीतयुद्ध कायम असल्याचेच दाखवून दिले आहे. 

आमदार कुपेकरही अस्वस्थ
चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर याही पक्षात अस्वस्थ असल्याचे समजते. चंदगड तालुक्‍यातील दौलत साखर कारखाना जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनाच भाड्याने दिला. याला श्रीमती कुपेकर यांचा विरोध होता. पण कारखानाच कोण घेत नसल्याने बॅंकेसमोरही पर्याय नव्हता. त्यातून श्रीमती कुपेकर नाराज आहेत. त्यातून त्यांनी जिल्हा परिषदेत भाजपशी हातमिळवणी करत दोन जागा निवडून आणल्या व पदाधिकारी निवडीतही भाजपसोबत राहिल्या. श्रीमती कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर या भाजपच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा आहे.

Web Title: kolhapur news ncp war by shetty aatmaclesh