वृत्तपत्र विक्रेत्यांचे आज मुंबईत अधिवेशन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

कोल्हापूर - मुंबईत राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे आज (ता. २६) मुंबईत अधिवेशन होणार आहे. कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर - मुंबईत राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे आज (ता. २६) मुंबईत अधिवेशन होणार आहे. कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील शेकडो वृत्तपत्र विक्रेते अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शिरोडकर सभागृह, केएम हॉस्पिटलजवळ, परळ येथे अधिवेशन होत आहे. संघटनेचे सल्लागार शिवगोंड खोत, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, संघटन सचिव रघुनाथ कांबळे, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मारुती नवलाई यांनी ही माहिती दिली. वृत्तपत्र विक्रेते, एजंट बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केले आहे.

कामगार मंत्र्यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची घोषणा तत्काळ अंमलात आणावी, यासह विविध मागण्यांबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे. राज्य संघटनेचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार, सरचिटणीस बालाजी पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, सचिव संजय पावसे, सदा नंदूर, जयंत डफळे या पदाधिकाऱ्यांनी परेल, मुंबईत भेट देऊन आढावा घेतला. विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर संघटनेने वेळोवेळी आवाज उठविला आहे.

वृत्तपत्र व्यवस्थापनासह शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्‍न मार्गी लावले आहेत. हीच एकजूट राज्याच्या मेळाव्यात दाखविली जाणार आहे. वृत्तपत्र विक्रेता राज्य संघटनेच्या छायेखाली एकवटला आहे. गेली अनेक वर्षे शासन दरबारी विक्रेत्यांना न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने स्थिरता आणि प्रगती करायची असेल तर मुंबई अधिवेशनाच्या निमित्ताने कल्याणकारी मंडळाच्या कामास सुरुवात होणे गरजेचे आहे.

बृहन्मुंबई संघटनेचे जगन्नाथ कोठेकर, कोल्हापूरचे भाऊ पोतदार, इचलकरंजीचे भाऊ सूर्यवंशी यांच्यासारख्या अनेकांच्या त्यागातून संघटनेची बीजे रोवली गेली. व्यवसायासोबत विकेत्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्र विक्रेता महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून शासनातर्फे मदतीचे आश्‍वासन दिले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१६ च्या अधिवेशनात कल्याणकारी मंडळ मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. ते क्रमांक दोनचे मंत्री असल्याने त्यांनी मनात आणले तर प्रश्‍न मार्गी लागू शकतो. कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी पंधरा ऑगस्टची डेडलाईन दिली. मंत्री, सरकारला वेळावेळी स्मरणपत्रे देण्यात आली. ठोस निर्णय झाला नाही. शासनाने तातडीने मंडळाची घोषणा करावी, अशी संघटनेची मागणी आहे.

राज्य संघटना उपाध्यक्ष श्री. सूर्यवंशी, संघटन सचिव रघुनाथ कांबळे (कोल्हापूर), शिवगोंड खोत, आण्णा गुंडे (इचलकरंजी), राज्य संघटना संचालक मारुती नवलाई, सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता एजंट संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, श्रीपती शियेकर, धनंजय शिराळकर, परशुराम सावंत, राजाराम पाटील, किशन शहापुरे, अनिल कोरवी, सुरेश ब्रह्मपुरे, अंकुश परब, बजरंग पाटील, संजय बुचडे, सतीश दिवटे, सागर रुईकर, संदीप चोपडे, सुनील समडोळीकर, रमेश जाधव, बाळासो अवघडे, सुनील पाटील, अतुल मंडपे, सुभाष बारदेस्कर, दिनकर चौगले, महादेव आडसुळे, संजय रजपूत, जयसिंग कांबळे (कोल्हापूर) आदींसह विक्रेते अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Kolhapur News Newspaper agents session in Mumbai