शाळानिहाय सभासद नोंदणीला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

कोल्हापूर - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेशन (सकाळ-एनआयई) या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शाळानिहाय सभासद नावनोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या उपक्रमासाठी २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी १५० रुपये शुल्क आहे. मराठी शाळांत हा उपक्रम सुरू करणारे ‘सकाळ’ हे महाराष्ट्रातील एकमेव दैनिक आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नागपूर, अमरावती अशा ठिकाणी हा उपक्रम होत आहे. सुमारे तीनशेहून अधिक शाळांतील विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. ‘सकाळ’-एनआयईच्या वतीने वर्षभरात कलाकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांवर शाळानिहाय कार्यशाळा तसेच ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, इको गणेशा, आंतरशालेय नाट्यस्पर्धा, निबंध स्पर्धा होतील. याबरोबर ‘सकाळ’-एनआयईचे १८ अंक सभासदांना मिळतील. यामध्ये अनेकविध लेख, गंमतकोडी यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांना शालोपयोगी हमखास भेटवस्तू देण्यात येतील. आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात व्हावा, यासाठी मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ‘सकाळ’-एनआयईतर्फे करण्यात आले आहे. सभासद नावनोंदणीसाठी, अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुशांत पाटोळे (८८८८१६६११४) यांच्याशी संपर्क साधावा. 

यामध्ये पहिल्या ५०० विद्यार्थ्यांना श्रुती पानसेलिखित आधुनिक स्फूर्तिकथा हे पुस्तक मिळेल. यामध्ये डॉ. अब्दुल कलाम, डॉ. एम. एस. स्वामिनाथन, एन. आर, नारायणमूर्ती, महाश्‍वेता देवी, राजेंद्र सिंह, डॉ. अमर्त्य सेन, वर्गिस कुरियन, ईला भट, किरण बेदी, अझीम प्रेमजी या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. 

Web Title: kolhapur news nie member registration start