हुबळी येथील नऊजण मोटार अपघातामध्ये जखमी

अभिजीत कुलकर्णी
सोमवार, 16 एप्रिल 2018

नागाव - मोटारीचा टायर फुटून झालेल्या अपघातात हुबळी येथील एकाच कुटुंबातील नऊ जण जखमी झाले. यामध्ये लहान मुलांसह महिलाही जखमी झाल्या आहेत. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संभापूर येथे आज दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.

जखमींवर कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अशी : द्राक्षायणी बडीगेर ( वय ४५ ), माहेश्वरी शेखर बडीगेर  ( २८ ), राणी शिवानंद बडीगेर  ( १० ), शशिकला सिध्दानंद बडीगेर  ( ३० ), विनायक बडीगेर  ( ४५ ), श्रीशैल बडीगेर  ( १८ ), शांताम्मा इराप्पा बडीगेर  ( ६० ) , संजू सिध्दानंद बडीगेर  ( २८ ) व सश्मिता बडीगेर  ( ६, सर्व जण रा. हुबळी , कर्नाटक )

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी - बडीगेर कुटुंबातील जवळचे नातेवाईक पुणे येथे राहतात. पुण्यात त्यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्याने सर्व जण मोटीरीमधून आज सकाळी निघाले होते. दुपारी एकच्या सुमारास संभापूर येथे मोटारीचा टायर फुटला. मोटार वेगात असताना टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार उलटली. यात मोटारीतील नऊही जण जखमी झाले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे व पेठवडगांव पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही.

Web Title: Kolhapur News Nine Injured in an accident