निर्भया पथकाचे पुनरुज्जीवन, अधीक्षकांकडून नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  बिनकामाचे निर्भया पथक पोलिस अधीक्षकांनी बरखास्त करून शहरात एकच पथक नव्याने सुरू केले. पथकाने आजच्या सलामीच्या दिवशीच महावीर गार्डनमध्ये असलेल्या चार प्रेमीयुगुलांवर कारवाई केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणून त्यांना समज देऊन सोडले. दोन दिवसांपूर्वीच ‘सकाळ’ने बिनकामाच्या निर्भयापथकाचा पर्दाफाश केला होता. त्याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी हा निर्णय घेतला.

वाजतगाजत सुरू झालेल्या निर्भया पथकाकडून अपेक्षित कामगिरी झालीच नाही. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून पोलिस अधीक्षकांचे लक्ष वेधले. यामुळे शहरातील सर्व पोलिस ठाण्यात असलेले निर्भया पथक बरखास्त करून शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकच पथक तयार केले आहे.

पथकात राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत दोन पुरुष आणि तीन महिला कर्मचारीही पथकात असणार आहेत. त्यांना एक गाडीही देण्यात आली आहे. येथून पुढे शहरात हे एकच निर्भया पथक कार्यरत राहणार आहे. आज पहिल्या दिवशी त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महावीर गार्डनमध्ये चार जोडप्यांवर बीपीॲक्‍टनुसार कारवाई करून त्यांना ताकीद देऊन सोडण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर म्हणाले, ‘‘नव्याने सुरू केलेले एकच निर्भया पथक शहरात येथून पुढे कार्यरत असेल. एक अधिकारी आणि चार कर्मचारी असे पाचजणांचे हे पथक असेल. त्यांच्यासाठी खास एका मोटारीची व्यवस्था केली आहे. हे पथक पूर्ण क्षमतेने काम करेल.’’

...तर आयुक्तांवर गुन्हा
राजहंस प्रिंटिंग प्रेससमोरील धोकादायक खड्ड्यामुळे काल झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शाहूपुरी पोलिसांना दिले. चौकशीनंतर आवश्‍यक वाटल्यास कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा, अशीही सूचना केली. काल प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी अपघाताची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर निश्‍चित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे केली आहे.

Web Title: kolhapur news nirbhaya Team revival