परवान्याचा नाही पत्ता, कोल्हापूरात केवळ विमानसेवेच्या गप्पा

सुनील पाटील
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  कोल्हापूर विमान हवाई वाहतुकीचा रद्द झालेला परवाना अद्यापही मंजूरच नाही. तसेच ज्या विमान कंपनीने कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली, त्या कंपनीला कोल्हापुरातच नव्हे, तर भारतातच विमान वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर येत आहे.  त्यामुळे कोल्हापूरात प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत यावर विश्‍वास ठेवायचा का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूर -  कोल्हापूर विमान हवाई वाहतुकीचा रद्द झालेला परवाना अद्यापही मंजूरच नाही. तसेच ज्या विमान कंपनीने कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली, त्या कंपनीला कोल्हापुरातच नव्हे, तर भारतातच विमान वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर येत आहे.  त्यामुळे कोल्हापूरात प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होत नाही, तोपर्यंत यावर विश्‍वास ठेवायचा का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूरची विमानसेवा २०११ पासून बंद आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. अमुक एक कंपनी विमानसेवा सुरू करण्यास तयार आहे, अशी चर्चा होऊन अधिकारी विमानतळाची पाहणी करतात. प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. रद्द झालेला विमान वाहतुकीचा परवाना मंजूर झालेला नाही. तसेच, ज्या कंपनीचा कोल्हापुरातून हवाई वाहतूक करण्याचा गवगवा होत आहे, त्या कंपनीला कोल्हापूरच नव्हे तर भारतातच हवाई वाहतुकीस परवाना नसल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्ष सुरू असलेली घाई-गडबड परवान्याच्या पातळीवर कधी सुरू होणार? हा प्रश्‍न आहे. 

मंगळुर विमानतळावर २०१३ मध्ये झालेल्या अपघातानंतर राज्यातील कोल्हापूरसह अन्य विमानतळांचे उड्डाण परवाने रद्द केले गेले. त्यानंतर पुण्यासह बेळगाव आणि अन्य विमानतळांनी नव्याने परवाने मिळविले, त्याच धर्तीवर कोल्हापूर विमानतळासाठी केंद्राकडून परवाना मिळावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे; पण हा परवाना मिळालेला नाही.

विमान वाहतुकीचा परवाना मिळत नाही, तोपर्यंत कोल्हापुरातून विमान उड्डाण होणार नाही. कोल्हापुरात विमान वाहतुकीसाठी येणारे अनेक अडथळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दूर केले जात आहेत. वनजमीन ताब्यात घेणे, संरक्षक कंपाउंड किंवा आता मोबाईल टॉवर काढण्याचे काम असो... प्रत्येक अडथळे दूर केले जात आहेत. प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी आवश्‍यक असणारा परवाना मात्र गुलदस्त्यातच आहे. 

कोल्हापुरातील विमानसेवा सुरू करावी, यासाठी सप्टेंबर महिन्यात मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी हवाई वाहतुकीसाठी आवश्‍यक असणारा परवाना त्वरित मिळावा, यासाठी चर्चाही झाली. बैठकीत परवाना त्वरित देण्याची हमीही नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून दिली गेली. विमानतळावरील अडथळ्यांबाबत वारंवार बैठका घेऊन तिथे तत्काळ दुरुस्त्या केल्या जात आहेत. विमानतळाचे काम पूर्णत्वास आले असतानाही विमान वाहतुकीसाठी परवाना नाही. हा परवाना मिळाला नसल्याने कोल्हापूर विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज होऊ शकलेले नाही. 

Web Title: Kolhapur News No permission of Airplane service