नृसिंहवाडी दत्त मंदिरात गुरुद्वादशी उत्सव सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

नृसिंहवाडी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात बुधवारपासून (ता. १०) गुरुद्वादशी उत्सवास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १६) गुरुद्वादशी उत्सव होणार आहे. श्री दत्त संप्रदायात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील गुरुद्वादशी उत्सवास अनन्यसाधारण महत्त्व असल्याने अनेक राज्यातून हजारो भाविक श्री दत्त दर्शनासाठी येथे येतात.

गुरुद्वादशी उत्सवानिमित्त उत्सव काळात श्री दत्त मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ ते बारा या वेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी बारा वाजता ‘श्रीं’च्या चरणकमलावर महापूजा होऊन दुपारी तीन वाजता पवमान पंचसुक्त पठण होईल. सायंकाळी पाच वाजता श्री मंदार गंगाधर व्यास (रा. डोंबिवली) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन रात्री ७.३० वाजता धूप, दीप, आरती व पालखी सोहळा होईल. रात्री दहा वाजता शेजारती होणार असल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राजेश खोंबारे व सचिव दामोदर संतपुजारी यांनी सांगितले.

गुरुद्वादशी उत्सवकाळात व सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा, गुजरातमधून हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. दत्त देव संस्थांनमार्फत गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शन रांग नियोजन, मुखदर्शन, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था आहे. देवस्थानचे सहकार्याने पारंपरिक मानकरी मोकाशी नरहरी, गणेश पुजारी, श्रीपाद ऊर्फ हरी गेंडे, विनायक गेंडे, बाळकृष्ण पुजारी, रमेश साधूपुजारी, नारायण चोपदार, मधुकर पुजारी, रामचंद्र गेंडेपुजारी, गुरुनाथ विष्णू पुजारी आदी उत्सवाचे नियोजन करत आहेत.

Web Title: Kolhapur News In Nrusinhwadi Datta temple Gurudwadashi festivals starts

टॅग्स