इचलकरंजीत पोपटांच्या संख्येत वाढ

इचलकरंजीत पोपटांच्या संख्येत वाढ

इचलकरंजी - शहरात पोपटांची संख्या वाढली असून, गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक पक्ष्यांनी स्थलांतर केल्याचे निदर्शनास आले आहे. यावर्षी कमी पावसामुळे पक्ष्यांची संख्या पावसाळ्यात रोडावली आहे. पावसाळ्यात इचलकरंजी परिसरात स्थलांतरित होऊन येणारा चातक हा पक्षी आलाच नसल्याचे आढळून आले आहे.

इचलकरंजी पक्षिमित्र संघटना, ‘सकाळ’ आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पावसाळ्यातील सामान्य पक्षिगणना केली. या वेळच्या मोहिमेमध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोहिमेची सुरवात सुंदर बाग येथून झाली. ‘सकाळ’चे बातमीदार संजय खूळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर सौ. चित्कला कुलकर्णी, विनय बनकर, बाळकृष्ण वरुटे, प्रसाद चिवटे, शशांक मराठे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे गट केले. त्यानुसार शहरातील विविध भागांतील पक्ष्यांची गणना केली. मोहिमेत रुई येथील जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिरमधील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यासमवेत शिक्षक नितीन चौगुले, स्वप्नील मुरचिटे, अमित कोरे, सौ. स्मिता उपाध्ये यांचाही सहभाग होता. 

एएससी कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थी डॉ. पी. के. वाघमारे, प्रा. फातिमा मुल्ला, प्रा. रेश्‍मा सनदी यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यामध्ये योगेश कुंभार, ऊर्मिला गळतगे, तमन्ना पटेल, सिमरन जमादार, रुक्‍साना मुल्ला, कोमल पाटील, जुवेरिया अत्तार या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या मोहिमेत अनन्या बनकर या छोट्या मुलीचाही सहभाग राहिला. त्याचबरोबर दीपक गिरी, पेठवडगाव येथील नीलेश घारसे व भादोले येथील डॉ. अमोल पाटील या पक्षिमित्रांचाही मोहिमेत सहभाग राहिला. संवाद सामाजिक मंडळाचे प्रकल्प समन्वयक 
अर्चना बनगे यांनी विविध कामांची विभागणी केली. 

असे आढळले पक्षी
पोपट- १४६८, रात्रीचर बगळे- ३७८, पाणकावळे- ४१६, ब्राह्मणी घार-१८, साधी घार- २४, कोकीळ -५, साळुंखी -१७४, भांगपाडी मैना-२४, चिमणी-२१८, साधे कावळे- ६८, जंगल कावळे-३२, भारद्वाज-६, बुलबुल-५८, पारवा-३३६, गप्पीदास-२४, इंडियन रॉबिन-२२, मॅगपाय रॉबिन-११, सुभग-८, सनबर्ड-२२, शिंपी-१७, नाचरा-८, लाल मुनिया- ६७, काळ्या डोक्‍याची मुनिया-११४, स्कली ब्रिस्टेड मुनिया-१०३, छोटा बगळा-१८, गाय बगळा- १७, मध्यम बगळा-६, राखी बगळा-७, जांभळा बगळा-९, जांभळी पाणकोंबडी-८, स्पून बिल- १८, ओपन बिल-२, चित्रबलाक-१७, स्पॉटबिल डक- १६, पांढऱ्या मानेवरचा करकोचा-८, चिमणा कंकर-५, ब्लॅक आयबीस-४, वंचक-२१, राखी वटवट्या-३९, शेकाट्या-२५, चष्मेवाला-१४, सॅंड पायपर-३, फ्लॉवर पेकर- १८, कापशी घार-२, खंड्या-८, पाईड किंगफिशर-३, व्हाईट किंग फिशर-४, सुगरण-२२, सॅलो-२४, होला-२८, खाटीक-७, टिटवी-४, तितर-२

डीकेटीईचे सहकार्य
या मोहिमेसाठी दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल ॲण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे, डायरेक्‍टर डॉ. पी. व्ही. कडोले यांनी राजवाडा परिसरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. डीकेटीईच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहारही देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com