जुन्या नोटा भरायच्या कुठे? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

कोल्हापूर -  नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकांकडे जमा झालेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश आज केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेला दिले; पण रिझर्व्ह बॅंकेत जिल्हा बॅंकांची स्वतंत्र खाती नसल्याने या नोटा भरायच्या कुठे, असा पेच जिल्हा बॅंकांसमोर निर्माण झाला आहे. आजच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेला पत्र पाठवून पैसे कुठे व कसे भरावेत याचे मार्गदर्शन मागवले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत 279.97 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा आहेत. या रकमेपोटी जिल्हा बॅंकेला दररोज सुमारे 15 लाख रुपयांचा भुर्दंड व्याजापोटी बसत आहे. 

आज केंद्र सरकारच्या वित्त विभागाने जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत स्वीकारण्याचा आदेश काढला. 30 दिवसांत या नोटा स्वीकारल्या जातील असे या आदेशात म्हटले आहे. नोटाबंदीचा कायदा करताना 40 दिवसांनंतर जुन्या नोटा या रिझर्व्ह बॅंकेतच स्वीकारल्या जातील, अशी तरतूद आहे. पण एकाही जिल्हा बॅंकेचे थेट खाते रिझर्व्ह बॅंकेत नाही. त्यामुळे नोटा स्वीकारण्याचे आदेश निघाले असले तरी यासंदर्भातील रिझर्व्ह बॅंकेचे धोरण ठरलेले नाही. आजच केंद्राचा आदेश निघाल्याने उद्या याबाबत रिझर्व्ह बॅंक आपले धोरण निश्‍चित करण्याची शक्‍यता आहे. या नोटा चेस्ट करन्सी शाखांतून स्वीकारायच्या की थेट रिझर्व्ह बॅंकेतून याचा निर्णय होईपर्यंत प्रत्यक्ष नोटा बदलण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

केडीसीसीकडील जुन्या नोटा 
नोटांचे मूल्य नोटांची संख्या मूल्य 
500 42,19,571 210.97 कोटी 
1000 6,87,987 68.79 कोटी 

एकूण 49,01,558 279.97 कोटी 

Web Title: kolhapur news old currency notes