इचलकरंजीत तरुणाचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

इचलकरंजी - घरामधील प्रवाहित विजेची दुरुस्ती करून तासाभराचा कालावधी लोटताच पुन्हा विजेचा प्रवाह सुरू झाला. या विजेचा धक्का बसून तरुण जागीच ठार झाला.

इचलकरंजी - घरामधील प्रवाहित विजेची दुरुस्ती करून तासाभराचा कालावधी लोटताच पुन्हा विजेचा प्रवाह सुरू झाला. या विजेचा धक्का बसून तरुण जागीच ठार झाला.

जुबेर नझीर मोमीन (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शहापूर (ता. हातकणंगले) येथे घडली. या प्रकरणी वीज वितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने आयजीएम परिसरात तणाव निर्माण झाला. जुबेर कपड्यांना रोलिंग करण्याचे काम करतो. त्याच्या मृत्यूने गणेशनगरात शोककळा पसरली होती.

मृत मोमीन यांच्या घरात वीजप्रवाह उतरत होता. याबाबत त्याने वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. दुपारी कर्मचाऱ्यांनी घरातील वीजप्रवाहाची दुरुस्ती केली. मात्र, तासाभरातच लोखंडी जिन्याशेजारी जुबेरला विजेचा धक्का बसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वीज कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती न केल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप केला. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. त्यामुळे बराच वेळ मृतदेह आयजीएममध्ये पडून होता. याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.

मुलगा बचावला
जुबेर मोमीन यांच्या घरात चार दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला विजेचा धक्का बसला होता. याचवेळी वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली होती. कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही. चार दिवसांनी काम केले; पण तेही व्यवस्थित केले नसल्यानेच ही घटना घडली.

आणखी एकास धक्का
येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीत बिरसा मुंडा (वय ३६) हा विजेचा धक्का बसून जखमी झाला. त्याला नातेवाइकांनी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार आज सकाळी साडेनऊला घडला. याची नोंद पोलिसांत झाली आहे.

Web Title: Kolhapur news one dead due to electric shock

टॅग्स