गव्याच्या धडकेत चंदगड तालुक्यात शेतकरी ठार

सुनील कोंडुसकर
बुधवार, 2 मे 2018

चंदगड - बुझवडे - गवसे (ता. चंदगड) मार्गावर कुुरणीनजीक गव्याने धडक दिल्याने नानाजी बाबू वरक ( वय 45, रा. बुझवडे धनगरवाडा, ता. चंदगड) जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 1) रात्री  दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

चंदगड - बुझवडे - गवसे (ता. चंदगड) मार्गावर कुुरणीनजीक गव्याने धडक दिल्याने नानाजी बाबू वरक ( वय 45, रा. बुझवडे धनगरवाडा, ता. चंदगड) हा शेतकरी जागीच ठार झाला. मंगळवारी (ता. 1) रात्री दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

वरक हे गेल्या वर्षापासून इब्राहीमपूर धनगरवाडा (ता. चंदगड) येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. तेथे ते शेती करीत होते. मंगळवारी ते बुझवडे धनगरवाड्यावर आपल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना रात्रीच्या वेळी हा अपघात झाला असण्याची शक्‍यता आहे. कुरणी गावच्या हद्दित विठोबा गावडे यांच्या शेताजवळ त्यांचा मृतदेह पडला होता. वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल डी. एच. पाटील, वि. ई. पाटील, वनरक्षक आर. आय. पाटील, सी. पी. पावसकर यांनी पोलीसांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सहाय्यक वनसंरक्षक श्री. गोसावी यांनी नातेवाईकांची भेट घेतली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान वरक यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुली, दोन मुलगे, आई असा परीवार आहे. शासन निर्णयानुसार मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे श्री. गोसावी यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News one dead in Gava attack