तोल जाऊन पडल्याने रूकडी येथील कामगार ठार

राजेंद्र होळकर
बुधवार, 16 मे 2018

इचलकरंजी - शहापूर येथील खंजीरे इस्टेट मधील विजयश्री सायझिंग कारखान्यामध्ये पत्रे बसवित असताना एक कामगार तोल जावून उंचावरुन खाली पडून जागीच ठार झाला. सत्यजीत भुजंग लोंखडे (वय 33, रा.आण्णाभाऊ साठे चौक, रुकडी, ता.हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे.

इचलकरंजी आणि परिसराला गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. यावेळी शहापूर येथील खंजीरे इस्टेटमधील उद्योजक स्वप्नील विजयकुमार शहा (रा.जानकीनगर, आवाडे कॉलनी) यांच्या मालकीच्या विजयश्री सायझिंग या कारखान्यावरील पत्रे उडून गेले होते. त्यामुळे या कारखान्यामध्ये आज सकाळपासून पत्रे बसविण्याचे काम सुरु होते. याचदरम्यान सत्यजीत लोंखडे या कामगाराचा पत्रे बसवित असताना तोल गेल्याने उंचावून खाली कोसळला. यावेळी त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी आयजीएम रुग्णालयात आणला. याच दरम्यान सत्यजीतचे नातेवाईक आणि मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी त्यांचा मृतदेह पाहून केलेला आक्रोश उपस्थिताचे मन हेलावून टाकणारा होता.

Web Title: Kolhapur News one labour dead in an accident