राज्याच्या तुलनेत कोल्हापूरात कांद्यास अधिक दर

शिवाजी यादव
बुधवार, 9 मे 2018

कोल्हापूर - राज्यभरातील कांदा बटाटा बाजारपेठेत कांद्याचे दर गडगडलेले आहेत. तसे कोल्हापूर बाजारपेठेत गडगडले आहेत. मात्र राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत एक दोन रूपये जास्त दर मिळत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा कोल्हापूर बाजारपेठेत आणला आहे. त्यातून आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणी तितक्‍या पुरवठ्याचे सुत्र सुधारले आहे.

कोल्हापूर - राज्यभरातील कांदा बटाटा बाजारपेठेत कांद्याचे दर गडगडलेले आहेत. तसे कोल्हापूर बाजारपेठेत गडगडले आहेत. मात्र राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत एक दोन रूपये जास्त दर मिळत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा कोल्हापूर बाजारपेठेत आणला आहे. त्यातून आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणी तितक्‍या पुरवठ्याचे सुत्र सुधारले आहे.

अशा स्थितीत ग्राहकांना कमी भावात कांदा मिळतो तर शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा विकावा लागतो असे चित्र बाजारपेठेत आहे. 

कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्डातील कांदा बटाटा बाजारपेठेत रोज सरासरी 80 ते 100 गाड्या कांदा येतो. यात गेल्या आठवड्याभरापासून रोज 20 ते 30 गाड्याची आवक वाढ झाली. त्यामुळे बाजारपेठेत कांदा हाऊस फुल्ल आहे. राज्यभरात कांद्याचे दर जवळपास 30 ते 70 रूपये दहा किलो असे भाव आहेत तर कोल्हापूरात 40 ते 90 रूपये असे दहा किलोचे भाव असल्याने बहुतांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माल येथे आणला आहे. यात श्रीगोंदा, अहमदनगर, दौंड, बारामती, इंदापूर, भिगवण या भागातील कांद्याची आवक सर्वाधिक आहे. 

येत्या आठवडाभरात या कांद्याचे सौदे होऊन शेतकऱ्याच्या खात्यांवर त्याचे पैसे जमा होतील. त्यानंतर हा कांदा कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडूकडे पाठविला जातो. 

पुणे नाशिक बाजार पेठेत कांद्याचे दर 20 ते 60 रूपयांपर्यंत उतरले. तसे तेथेही आवक जास्त असल्याने कांद्याचे दर आणखी कमी येतील, असा अंदाज आहे. कोल्हापूरात स्थानिक पातळीवर कांद्या उत्पादन नगन्य आहे. त्यामुळे येथील बाजारपेठेत जेवढा माल येतो त्याचा त्वरीत उठाव होतो. तसेच दोन रूपयांनी दर जास्त मिळतो, म्हणून कांदा येथील बाजारपेठेत आणल्याचे नंदूकुमार खडताळे (श्रीगोंदा) यांनी सांगितले. 

येथील बाजार पेठेत कांद्या बरोबर बटाट्याची आवक जास्त प्रमाणात झाली आहे. लग्न सराई तसेच पर्यटनामुळे खाद्य पदार्थांची मागणी वाढली आहे त्यामुळे बटाट्याची मागणी आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत असल्याने आग्रा, इंदोर, भिसा मध्यप्रदेश येथून रोज जवळपास 30 ते 35 गाड्या बटाट्याची आवक होते. 

कांद्याचे घाऊक दर

400 ते 950 क्विंटल ( किरकोळ बाजारात दर 5 रू. ते 15 रूपये एक किलो) 
बटाटा दर

1400 ते 2100 रू. क्विंटल ( किरकोळ बाजारात दर 15 रू. ते 25 रूपये एक किलो) 

Web Title: Kolhapur News Onion Rate in Kolhapur Market