पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठी रूकडीकरांचे अनोखे आंदोलन

सचिन सावंत, सागर कुंभार
शुक्रवार, 1 जून 2018

रूकडी -  पंचगंगा बचाव कृती समीती तर्फे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांच्या नेतृत्त्वात नदी प्रदुषण मुक्तीसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जनावरांच्यासह नदीत उतरून गावकऱ्यांनी आज आदोलन केले. धैर्यशिल माने यांच्यासह रुकडीतील ग्रामस्थांनी नदीतील केंदाळ गळात घालून प्रदुषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

रूकडी -  पंचगंगा बचाव कृती समीती तर्फे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशिल माने यांच्या नेतृत्त्वात नदी प्रदुषण मुक्तीसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जनावरांच्यासह नदीत उतरून शेकडो गावकऱ्यांनी आज आदोलन केले. धैर्यशिल माने यांच्यासह रुकडीतील ग्रामस्थांनी नदीतील केंदाळ गळात घालून प्रदुषणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेली पंचगंगा प्रदूषित होत असून तिला गटारगंगेचे स्वरूप मिळत आहे. हे प्रदूषण रोखा आणि ग्रामीण जनतेला पाणी द्या अन्यथा करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्‍यातील नदीकाठच्या 174 गावातील जनतेचा आक्रोश अनावर होईल, असा इशारा यावेळी पंचगंगा बचाव कृती समितीने यांनी दिला. 

पंचगंगेच्या प्रदुषणाचा फटका रूकडी गावाला बसत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य स्वच्छ राहण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरातील सांडपाणी तसेच आैद्योगिक वसाहतींचे रासायनिक पाणी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी निधी देण्याची गरज आहे. शहर-ग्रामीण असा वाद न करता याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

- धैर्यशील माने, माजी  जिल्हा परिषद उपाध्यक्ष

दरम्यान, रुकडी येथून पंचगंगा बचाव कृतीसमितीच्या साखळी उपोषणाला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता येथील हजरत पीर राजेबागस्वार दर्ग्यातून पंचगंगा नदीकडे ग्रामस्थ मोर्चाने घोषणा देत गेले. धैर्यशील माने यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व आंदोलक पंचगंगेच्या वाहत्या पाण्यात उतरले. या पाण्यातून येणारी जलपर्णी अंगावर घेत त्यांनी पंचगंगेच्या पाण्यात उभे राहून जमलेल्या हजारो आंदोलकांना उद्देशून सामील होण्यास आवाहन केले. 

आज उपोषणानिमित्त रुकडीतील सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. आंदोलनात स्त्रियांनीही नदीपात्रात उतरुन सहभाग नोंदविला. यावेळी हातकणंगले, शिरोळ व करवीर तालुक्‍यातील नागरीकांचीही उपस्थिती होती.

नदीपात्रातील आंदोलनानंतर चावडी चौकात साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. आंदोलनास माजी खासदार निवेदिता माने, सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, हातकणंगले कॉंग्रेस अध्यक्ष भगवानराव जाधव, अभिनंदन खोत, बबलू मकानदार, नंदू शिंगे, डॉ. विजय पवार आदी उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue