रसायनयुक्त पाणी थेट मिसळतेय पंचगंगा नदीत

निखिल पंडितराव
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत होतेच; पण आता औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळू लागले. रसायनयुक्त पाणी लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथून कशा पद्धतीने थेट नदीत सोडले जाते, याचा व्हिडिओच सामाजिक कार्यकर्ते संदीप गुदले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.

कोल्हापूर - पंचगंगा नदीत सांडपाणी थेट मिसळत होतेच; पण आता औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळू लागले.

रसायनयुक्त पाणी लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथून कशा पद्धतीने थेट नदीत सोडले जाते, याचा व्हिडिओच सामाजिक कार्यकर्ते संदीप गुदले यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्यांनी थेट घटनास्थळी उभे राहूनच व्हिडिओ केला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाला इशारा दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी कार्यकर्ते संतप्त झाले असून दूषित पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला  आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न अधिक गंभीर बनत चालला आहे. 

आंदोलनाचा इशारा
उन्हाळ्यात ही परिस्थिती तयार होणे अत्यंत गंभीर आहे. इचलकरंजीपासून पुढे नदीकाठच्या गावांत काही वर्षांपूर्वी हे दूषित पाणी पिऊन ४४ जणांना जीव गमवावा लागला. तरीही पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न प्रशासन गंभीरपणे घेत नसल्याचे दिसते. रसायनयुक्त पाणी सोडणे बंद करण्याचा इशारा गुदले यांनी दिला. दूषित पाणी अशाच पद्धतीने सोडत राहिल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासनाविरुद्ध आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

नदीकाठच्या गावांत आतापासूनच पाण्याचा रंग बदलण्यास सुरवात झाली आहे. तेरवाड (ता. शिरोळ) येथे मासे मृत होण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. मैलायुक्त सांडपाणी थेट मिसळत होतेच; पण आता औद्योगिक वसाहतीमधील रसायनयुक्त सांडपाणीही नदीत मिसळत आहे. कागल फाईव्ह स्टार औद्योगिक वसाहत येथील केमिकलयुक्त पाणी थेट नदीत मिसळत होते; परंतु कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करून हे थांबवले.

आता परत लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथून केमिकलयुक्त पाणी थेट नदीत मिसळण्यास सुरवात झाली आहे. प्रदूषणप्रश्‍नी अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते संदीप गुदले यांनी कशा पद्धतीने हे पाणी थेट नदीत सोडले जाते, याचे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शूटिंग करून व्हिडिओच फेसबुकवर व्हायरल केला. 

औद्योगिक वसाहत येथे रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदीत सोडणे प्रदूषण नियंत्रण नियमांविरुद्ध आहे. सध्या लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथून बाहेर पडणाऱ्या या दूषित पाण्यामुळे इंगळी, रूई या गावांना दूषित पाण्याचा गंभीर धोका आहे.

 

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue