प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय द्या - प्रांताधिकारी शिंगटे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नगर पालिकेने केलेल्या उपाय योजनांची १ फेब्रुवारीला लेखी माहिती द्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केली.

इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी नगर पालिकेने केलेल्या उपाय योजनांची १ फेब्रुवारीला लेखी माहिती द्यावी, अशी सूचना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी केली. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी दाखल केलेल्या तक्रारीची सुनावणीवेळी प्रांताधिकाऱ्यांनी या सूचना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रदूषणप्रश्‍नी दिलीप देसाई यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची सुनावणी घेऊन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या होत्या. फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी इचलकरंजीचे मुख्याधिकारी, जलअभियंता, आरोग्य अधिकारी, सीईटीपीचे अध्यक्ष यांना नोटीस बजावली होती. आज त्याची सुनावणी झाली.

सुनावणीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, जलअभियंता सुरेश कमळे, आरोग्य अधिकारी महाजन, सीईटीपीचे अध्यक्ष गिरीराज मोहता यांनी म्हणणे मांडले. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती १ फेब्रुवारीपूर्वी देण्याच्या सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या. आता याची पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे. देसाई यांनी तक्रार केल्यानंतर समितीने पंचगंगा नदी तसेच सीईटीपी व इतर ठिकाणातील पाण्याचे नमुने काही दिवसापूर्वी घेतले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आज ही सुनावणी झाली.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पंचगंगेतील प्रदूषण तत्काळ थांबवावे अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन करील, असा इशारा दिला. या वेळी भगवान काटे, सागर संभूशेटे, बंडू पाटील, विश्‍वास बालिघाटे, राजगोंडा पाटील, प्रशांत कुगे, आदिनाथ वसवाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue