अवजड वाहनांची वाहतूक शिवाजी पुलावरून थांबवावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर -  पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा वापर अवजड वाहनांसाठी थांबवावा आणि या पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची वेगमर्यादा कमी असावी, असा अंतिम अहवाल या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणाऱ्या धुव्र कन्सल्टन्सीने दिला आहे; मात्र १४० वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात व वापरात असलेल्या या पुलाच्या दगडी कमानींची कसलीही हानी झाली नसल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे.

पंचगंगा नदीस महापूर आल्यानंतर पाण्याची पातळी मच्छिंद्री या इशारा रेषेच्या वर कोणत्याही परिस्थितीत जाऊ देऊ नये, असा इशाराही अहवालात दिला आहे. पुलाच्या आयुर्मर्यादेचा विचार करता सद्यःस्थितीत एसटी व केएमटी प्रवासी वाहतूक वगळता अन्य अवजड वाहनांसाठी हा पूल बंदच केला आहे. तसेच मच्छिंद्री या इशारा रेषेच्या वर कधीही महापुराची पातळी गेलेली नाही.

 दगडी कमानी सुस्थितीत
 मच्छिंद्री या इशारा पातळीवर पाणीपातळी जाऊ देऊ नये
 काही ठिकाणी दोन दगडांतील दर्जा निघाला
 पुलाचा रस्ता व भरावात काही ठिकाणी पोकळपणा
 
अवजड वाहने कोणती?
सध्या दुचाकी, तीनचाकी, टेंपो, केएमटी, एसटी, ट्रॅक्‍टर ही वाहने पुलावरून जात आहेत; मात्र ट्रक, ट्रेलर, बुलडोझर, कंटेनर यांशिवाय अवजड यंत्रसामग्री, उपकरणे वाहून नेणारी दहाचाकी, बाराचाकी, वीसचाकी किंवा त्यांवरील वाहने पुलावरून नेणे बंद केले जाईल. अवजड वाहनांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ व पोलिस प्रशासनास पत्र देणार आहे.

संबंधीत बातम्या - 

Web Title: Kolhapur News Panchaganga Shivaji Bridge Issue