पर्यायी शिवाजी पुलासाठी शुक्रवारपासून रास्ता रोकोचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर - पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले बांधकाम चार दिवसांत सुरू झाले नाही, तर शुक्रवार (ता. ११) पासून शिवाजी पूल, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हे दोन्ही रस्ते बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने  जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला.

कोल्हापूर - पर्यायी शिवाजी पुलाचे रखडलेले बांधकाम चार दिवसांत सुरू झाले नाही, तर शुक्रवार (ता.११) पासून शिवाजी पूल, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हे दोन्ही रस्ते बंद करण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने  जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला.

कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर प्रशासनाने काय करायचे ते करावे; गुन्हे दाखल करा, पोलिस यंत्रणा लावा; पण पर्यायी पूल बांधायचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. वेळप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला.

पालकमंत्र्यांच्या घरावरही मोर्चा
लोकप्रतिनिधीही या कामात कमी पडत असल्याचा आरोप करीत अशोक पोवार यांनी वेळप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही घरावर मोर्चा नेण्याचा इशारा या वेळी कृती समितीने दिला.

जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी 
अशोक पोवार यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी म्हणून आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. निष्ठेने काम केले. अधिकाऱ्यांचे मनोबल कमी करू नये, कामावर कोणाचा आक्षेप असेल तर मी रजेवर जाईन,’’ असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यातले आपले आवडीचे खासदार आणि आपले पालकमंत्री यांनीही यासाठी प्रयत्न करायला हवा. पालकमंत्री एका पक्षाचे नसतात. पुलाच्या कामासाठी त्यांनीही आपली ताकद पणाला लावली पाहिजे.
- आर. के. पोवार

Web Title: Kolhapur News Panchganga Shivaji Bridge issue