चार दरवाजाच्या चोरवाटा होताहेत जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पन्हाळा - पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारातील नामशेष होत चाललेल्या चार दरवाजाच्या तटबंदीतील चोरवाटा, सैनिकांना बसण्यासाठी केलेल्या देवड्या पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षामुळे जाळ्यावेलींनी तर बुजल्या आहेतच; पण आता अतिपावसामुळे त्याही जमिनदोस्त होवू लागल्याने नवीन पिढीला ऐतिहासिक दरवाजांची बांधणी, त्याकाळी कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना त्यात केलेल्या अंतर्गत सोईही येथून पुढे पाहता येणार नाहीत. 

गडावर येण्यासाठी पूर्वी सध्यासारखे रस्ते नव्हते. पूर्वेकडून चार दरवाजा, पश्‍चिमेकडून तीन दरवाजा तर उत्तरेकडून येण्यासाठी वाघ दरवाजा आहे. 

या दरवाजातूनच बाहेरच्या लोकांना प्रवेश मिळायचा. अर्थात गडावरील लोकांना मात्र बाहेर जाण्यासाठी चोरवाटा होत्या. त्या मात्र खासगीतल्या लोकांनाच माहिती असायच्या. 

चार दरवाजे हे एकाला लागून एक अगर एका पाठोपाठ दुसरा असे नव्हते तर शत्रूच्या सहजासहजी माऱ्यात येवू नयेत, सहजासहजी लक्षात येवू नयेत अशीच त्यांची रचना होती. मुख्य दरवाजा तटबंदीला लागून, दोन्ही बाजूंच्या बुरजांच्या आत, तर आतील तिन्ही दरवाजे पडकोटाच्या आतील बाजूस. सध्या नेबापूर, मंगळवारपेठेत जायला जो पायऱ्यांचा रस्ता आहे तेथे पहिला दरवाजा. 

पन्हाळगडावर आपण आता वाहनातून येतो तो दुसरा दरवाजा. त्यांच्या आतील बाजूस दक्षिण बाजूस जाणारा तिसरा दरवाजा. तर वरच्या बाजूस पश्‍चिमेकडे जाणारा कसाबसा अद्याप टिकून राहिलेला चौथा दरवाजा. या चारी दरवाजात पुर्वी तपासणी होवूनच गडावर प्रवेश मिळायचा. 

इंग्रजी राजवटीत हे दरवाजे पाडून रस्ता तयार झाला. मात्र पहिल्या आणि तिसऱ्या दरवाजातील दरवाजाची ठेवण, त्यांच्या दगडी ऐसपैस चौकटी, त्यावरील कोरीव काम, पहिल्या दरवाजाच्या बुरजात केलेल्या चोरवाटा, देवड्‌या, सैनिकांना विश्रांतीसाठी केलेल्या लहान-लहान खोल्या, टेहळणीसाठी ठेवलेले झरोके जुन्या वैभवाची साक्ष देत आजही जीर्णावस्थेत का होईना; पण अस्थिर पायावर  उभ्या आहेत. 

जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे 
चार दरवाजातील हा ऐतिहासिक छुपा ठेवा पुरातत्त्व खात्याने मध्यंतरी जाळ्या झुडपे तोडून, दगडधोंडे काढून खुला केल्याने इतिहासप्रेमी पर्यटकांची उत्सुकता ताणली होती. पण खात्याने फक्‍त एकदाच साफसफाई केली, त्यानंतर दुर्लक्ष केले. परिणामी चार दरवाजाच्या बुरजातील, तटबंदीतील हा गुप्त ठेवा नामशेष होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच आता हा ठेवा जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, आहे त्या वास्तु जपण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्यांची डागडुजी करून किमान आहे त्या अवस्थेत तरी त्या ठेवल्या पाहिजेत.

Web Title: kolhapur news Panhala fort Panhala