पर्यावरण जतन, संवर्धनासाठी प्लॅनेट अर्थ फौंडेशनची स्थापना

राजेश मोरे
रविवार, 25 मार्च 2018

कोल्हापूर - पर्यावरणशास्त्र विभागात शिक्षण घेताना पर्यावरणाचे महत्व त्यांनी जाणले. पर्यावरणाचे जतन, संवर्धनाचे कार्यही त्यांनी सुरू केले. आज ना उद्या शिक्षण संपेल, पण हे कार्य थांबले नसले पाहीजे. याच उद्देशाने "प्लॅनेट अर्थ फौंडेशन' संस्थेची स्थापना केली.

कोल्हापूर - पर्यावरणशास्त्र विभागात शिक्षण घेताना पर्यावरणाचे महत्व त्यांनी जाणले. पर्यावरणाचे जतन, संवर्धनाचे कार्यही त्यांनी सुरू केले. आज ना उद्या शिक्षण संपेल, पण हे कार्य थांबले नसले पाहीजे. याच उद्देशाने "प्लॅनेट अर्थ फौंडेशन' संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, प्लास्टिकमुक्ती आणि ध्वनीप्रदुषण रोखण्याचेही काम पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी हाती घेतले. 

पर्यावरण प्रेमी प्रणव महाजन या विद्यार्थ्यांने शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागात प्रवेश घेतला. गेल्या चार वर्षापूर्वी ते मित्रासह "सह्याद्री टायगर रिझर्व' प्रकल्पाशी जोडले गेले. तेलंगा, मेळघाट, दांडेली आदी ठिकाणी त्यांनी वन्यप्राण्यांबाबत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी व्याघ्रसह प्राणी गणनाही केली. ग्लोबल वॉर्मिंग रोखायचे असेल तर पर्यावरणाचे जतन संवर्धना शिवाय दुसरा पर्याय नाही हे जाणले. वृक्षारोपणास सुरवात केली. त्याचबरोबर वृक्षांचे जतन करा, वृक्ष लावा, वन्यजीवांचे संरक्षण करा. त्यांचा समतोल बिघडू देऊ नका याबाबत समाजाचे प्रबोधन करण्यास सुरवात केली.

विद्यार्थी दक्षेत त्यांचे काम उत्साहात सुरू आहे. पण उद्या नोकरी व्यवसायाच्या निमित्याने ते बंद होऊ नये. हे काम अखंडित सुरू रहावे, भावी पिढीने त्याचे नेतृत्व करावे, या उद्देशाने सात ते आठ महिन्यापूर्वी प्रवण व त्यांच्या मित्रांनी "प्लॅनेट अर्थ फौंडेशन'ची स्थापना केली. 

संस्थेच्या माध्यमातून प्रणव यांच्यासह दिग्विजय कोपार्डेकर, निलिमा देशमुख, निचिकेत पाटील, विनायक साळुंखे, विशाल शेंडगे, प्रसाद भोसले, प्रिया पाटील, अनुप परीट आदींची पर्यावरण जतन संवर्धाचे काम सुरू केले.

मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. मात्र किरकोळ पैशाच्या मोहापायी त्याची तोड होते. असे वृक्ष जाळून कोळसा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याचे महत्व संबधिताला जमीन मालकाला पटवून देण्याचे अनोखे कार्य संस्थेमार्फत कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधूदुर्गात विद्यार्थी करतात. याचबरोबर पन्हाळा तालुक्‍यात जैव विविधता संरक्षणाचे कामही हाती घेतले आहे. 

प्लास्टीक मुक्तीसाठी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. बत्तीस शिराळा येथे रॅली काढून त्यांनी नागरिकांना प्लास्टिक वापराचे धोके पटवून दिले. बचत गटामार्फत कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. राज्यात कचऱ्याच्या गंभीर समस्येवर कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करा याबाबतचे प्रबोधन केले जात आहे. गणेशोत्सव काळात शहरातील 413 मंडळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी डॉल्बीचे मनुष्य व प्राणीमात्रावर होणारे घातक परिणामाची माहिती दिली. त्यांच्या प्रयत्नाला म्हणावे तितके यश आले नसले तरी आज ना उद्या या प्रबोधनाला यश मिळेल असा संस्थेचा विश्‍वास आहे. 

पर्यावरणाचे जतन संवर्धन 
प्लॅनेट अर्थ फौंडेशन या संस्थेत सहभागी तरुणांची संख्या वाढत आहे. पर्यावरणाचे जतन संवर्धनासाठी संस्थेच्या माध्यमातून अखंडित कार्य केले जाईल. 
- प्रवण महाजन
 , संस्थेचे संस्थापक 
 

Web Title: Kolhapur News Planet Earth Foundation for conservation of environment